चकलांबा पोलिसांनी दाखवली तत्परता

 अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणारे परजिल्ह्यातील दोघेजण पकडले



  

गेवराई,एमबी न्यूज वृत्तसेवा...

 अल्पवहिन मुलीस पळवणारे पर जिल्ह्यातील दोघेजण तात्काळ जेरबंद  करण्यात आले आहेत. 

    सध्या होत असलेला बेसुमार सोशल मीडियाचा वापर व त्यामुळे होणारे दुष्परिणाम सध्या समाजातील सर्वच घटकांना अनुभवास मिळत आहेत. सोशल मीडिया गैर वापरा मुळे लहाना पासून  मोठ्यापर्यंत सर्वजण अडचणीत येत असल्याचे आपणास ऐकावयास व पाहावयास मिळत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे अल्पवयीन मुलांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे सावट ओढवल्याचे  पावयास मिळत आहे अशाच प्रकारची घटना काल उमापूर येथे एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडली असून सदर पीडित अल्पवयीन मुलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून तिला वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून फुस  लावून जबरदस्तीने पळून नेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु सदर पीडित मुलीच्या ओरडण्यामुळे व उमापुरातील जागरूक नागरिकांमुळे सदरचा प्रकार आणून पाडण्यास पोलिसांना यश आले असून पोलिसांना सदर सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ टीम रवाना केली. पोलिसांची चाहूल लागताच  आरोपींनी  पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या  सतर्कतेमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. पोलिसांनी पॉलिसी  खाक्या दाखवत दोन्ही आरोपींना  वापरलेल्या मोटरसायकल सह ताब्यात घेऊन व पीडित मुलीची आरोपीच्या ताब्यातून  सुटका करून व तिला  अभय देऊन पोलीस स्टेशन येथे आणून सदर घटनेची सविस्तर चौकशी करून पीडित मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पीडित मुलीच्या व तिच्या आईच्या जबाबवरून पोलीस ठाणे चकलांबा येथे चकलांबा पोलीस ठाणे गु रन  236 /2023 भादविस कलम  363,354, पोक्सो कायदा कलम  8, 12 प्रमाणे गुन्हा  दाखल केला असून सदर गुन्ह्यामध्ये  आरोपीत नामे 1) समाधान उर्फ अभिजीत नागनाथ ठोंगे  वय 26 वर्ष 2) प्रमोद बाळासाहेब लोखंडे वय 29 वर्ष दोन्ही रा हिंगणगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे प्रमुख  एपीआय प्रफुल्ल साबळे हे करत आहेत. सदर वेळी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एपीआय  नारायण एक शिंगे यांनी अल्पवयीन मुलांना मोबाईलच्या वापरापासून दूर ठेवण्याबाबत तसेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला गैरवापर व पाल्यांकडे  पालकांचे झालेले दुर्लक्ष याकडे लक्षवेधून आपल्या पाल्यांना विश्वासात घेऊन कुठलाही संकोच न बाळगता  त्यांना घरातच लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचे आव्हान केले आहे. जेणेकरून  अल्पवयीन मुले  सोशल मीडियाच्या गैरवापराच्या आहारी जाऊन काही चुकीचे कृत्य करणार नाहीत.

   सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पीएसआय तांगडे, स फौ/ एकाळ, पोह / पवार, पोह / कुलकर्णी त्यांनी केली असून सदर कारवाईबाबत चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत तसेच उमापूर हद्दीमध्ये चकलांबा पोलिसांचे कौतुक केले जात असून सदर कारवाईमुळे समाजामध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !