इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

स्वागत- सत्कार

 परदेश दौऱ्यावरुन आल्याबद्दल सत्कार करून स्वागत


परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे दक्षिण आफ्रिका येथून दहा दिवसाचा दौरा यशस्वी पणे  पूर्ण करून आज परळी शहरात आगमन झाल्याबद्दल महिंद्रा चे डिस्ट्रीब्यूटर गोविंद मोटर्सचे संचालक अजित दिलीपराव देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.      

           लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, माजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी ,रामेश्वर महाराज कोकाटे यांनी अजित देशमुख यांचे परळीत स्वागत केले तसेच भाजपाचे  अश्विन मोगरकर, शिवसेनेचे सचिन स्वामी,नाना जाधव, यांनीही त्यांचे स्वागत केले.               महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे दहा दिवसांचा अभ्यास दौरा दक्षिण आफ्रिका  मधील जोहान्सबर्ग ,केप टाऊन मोजल बे नाईजना येथे होता,जगभरातील  निवडक तीनशे डीलर्स आले होतें,त्यात परळीतील शंकर पार्वती नगर भागातील अजित देशमुख यांचा समावेश होता,अजित देशमुख हे महिंद्रा ट्रॅक्टर, श्रीजित  फायनान्स, हिरो शोरूम चा कार्यभार  मागील सहा वर्षापासून सांभाळत आहेत.यापूर्वी  त्यांनी युरोप ,टर्की पॅरिस ,स्विझर्लंड ,दुबई यासह अनेक देशांचा दौरा केला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!