भेल संस्कार केंद्रात राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा!!" विशेषांकाचे शानदार प्रकाशन

 भेल संस्कार केंद्रात  राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते  लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा!!" विशेषांकाचे शानदार प्रकाशन


 परळी वैजनाथ........

                   येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित नेहमीच नवोपक्रमात अग्रेसर असणाऱ्या भेल संस्कार केंद्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सांस्कृतिक वार्तापत्र चा "लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा!!" या विशेषांकाचे प्रकाशन आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते श्री राहुल सोलापूरकर यांचे याच विषयावर जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांचे सांगितीक स्वागत श्री. राहुल सुर्यवंशी सर यांच्या स्वागतगीताने करण्यात  आले नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते  लढा! मराठवाडा मुक्ती  संग्रामाचा!! या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर तर सुनीताताई पेंढारकर  इ. यांची विशेष उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. जुगल किशोर लोहिया (सचिव, भेल सेकंडरी स्कूल) यांनी भूषवले. तसेच श्री. विकासराव डुबे, डॉ.  श्री.विष्णुपंत कुलकर्णी,श्री.जीवनराव गडगूळ श्री. राजेश्वर देशमुख, श्री.अमोल डुबे , श्री. गिरीश ठाकुर (प्रिन्सिपल, सीबीएसई),श्री. एन. एस. राव (प्रिन्सिपल, स्टेट) श्री. सुनील बोटकुलवार (उपप्राचार्य), सर्व विभाग प्रमुख इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

त्यानंतर आपल्या मनोगतात सौ.सुनीताताई पेंढारकर यांनी सांस्कृतिक वार्तापत्र या पाकशिकाची पार्श्वभूमी सांगून ते पुढे जागरण पत्रिका कशी बनले ते सांगितले.याची प्रमुख टॅगलाईन म्हणजे "हिंदूच्या मनातील हिंदुत्वाची तार छेडणे" हे आहे असे मत व्यक्त केले.

       मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात हा संग्राम चालू होता. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे सैन्यप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी शरणागती स्वीकारली व निजामाने पराभव मान्य केला आणि हैदराबाद संस्थानात शेवटी तिरंगा फडकला.

      याप्रसंगी पुढे बोलताना मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर म्हणतात की या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.यात प्रामुख्याने स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान खुप मोलाचे आहे.तसेच त्यांनी या लढ्याचा खरा  इतिहास  सर्वाना माहित असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.त्यासाठी  त्यांनी तो इतिहास वेगवेगळ्या शैलीत  पुर्ण सांगितला आणि येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी आपण सर्वानी मिळून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अगदी जल्लोषात व उत्साहात साजरा करूया असे म्हणत भारत माता की जय आणि वंदे मातरम इ.घोषणा देऊन आपले मनोगत थांबविले.याप्रसंगी सर्वजण अगदी भारावून गेले होते.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना श्री.जुगलकिशोर लोहिया आपल्या मनोगतात म्हणतात की " या लढ्यात आर्य समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची होती. ही निजामशाही व रझाकराचा काळ अनुभवणारी व्यक्ती आजही जिवंत अ सून ते त्यांच्या भावना व्यक्त करतात.याचा आपल्याला विसर पडता कामा नये.असे मत व्यक्त केले.

 तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सौ.रोहिणी वाकडे मॅडम यांनी समर्थपणे वाहिली  तर आभार प्रदर्शनाची धुरा सौ.विद्युलता कराड मॅडम   यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख श्री.नामदेव मुंडे सर व सौ.पुनम मंडलिक मॅडम यांनी संकुलातील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मदत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी  करण्यात मोलाचा वाटा प. त्याचबरोबर या कार्यक्रमास शहरातील बालगोपालासहित पालकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला.  या कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने करण्यात आली.अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख श्री.प्रफुल्ल सर यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमास देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !