महिला महाविद्यालयातील प्रा.शेप नेट परिक्षा उत्तीर्ण; महाविद्यालयाच्या वतीने सत्कार




परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्राध्यापिका पृथ्वी देविदास शेप या नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील रसायनशास्त्रातील युजीसी नेट परिक्षा पास झाल्या असून महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी (दि.०२) शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्राध्यापीका पृथ्वी देविदास  शेप यांनी यापूर्वी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली अत्यंत कठीण असलेली सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्या असून आता नुकतीच रसायनशास्त्र विषयातून राष्ट्रीय स्तरावर असलेली पात्रता परिक्षा युजीसी नेट या उत्तीर्ण झाल्या आहेत. लग्न झाल्यानंतरही अत्यंत कठीण परिस्थितीत मुलेबाळे संभाळून शिक्षणा संदर्भात जिद्द असल्याने युजीसी नेक परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. याबद्दल महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने बुधवारी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ विलास देशपांडे, प्रा.डॉ. विवेकानंद कवडे,प्रा शरद रोडे, प्रा विशाल पौळसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार