परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

 गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के




मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

परळी  (प्रतिनिधी)

भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के यांनी व्यक्त केले.

 मौजे जवळगाव येथे गुरुवर्य दौलतराव गुरुजी खानापूरकर व समस्त जवळगाव येथील ग्रामस्थांच्या  मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास दिनांक 22 ऑगस्टपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. कथा वाचन पंडित पुरुषोत्तम तिवारी महाराज जवळगाव वृंदावन धाम हे करीत आहेत.याप्रसंगी ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के हे बोलत होते. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे पहाटे 4 ते 6 काकड आरती ,6ते 6.30 विष्णुसहस्त्रनाम, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण ,11 ते 12 गाथा भजन, 1 ते 5 श्रीमद् भागवत कथा, 5 ते 6 हरिपाठ व धुपारती ,रात्री 9 ते 11, हरिकीर्तन व रात्री 11 ते 4 हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होत असून ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के परळी वैजनाथ हे आहेत. दिनांक 21 ऑगस्ट रोजी ह भ प किसन महाराज पवार , दिनांक 22 ऑगस्ट रोजी ह भ प किशोर महाराज , दिनांक 23 ऑगस्ट रोजी ह भ प आकाश महाराज खारगावकर यांचे कीर्तन संपन्न झाले. 24 ऑगस्ट रोजी ह भ प विकास महाराज वायसे शास्त्री वाकीकर, 25 ऑगस्ट रोजी ह भ प मधुकर महाराज मोहगावकर, 26 ऑगस्ट रोजी ह भ प उद्धव महाराज रमजानपूरकर ,रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी ह भ प अरुण महाराज शिंनगारे बर्दापूरकर यांचे कीर्तन संपन्न होणार असून सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा वाजता ह भ प श्री विठ्ठल महाराज घाडगे शिवनखेडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच सकाळी सात ते दहा वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी मिरवणूक निघणार आहे

यावेळी ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के यांनी सांगितले की, गुरू कोण असावा ? यापासून शिष्यापर्यंतची संपूर्ण व्याख्या अतिशय सहजतेने व विविध उदाहरणासह स्पष्ट केली. पुढे बोलताना ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के म्हणाले की, गुरू सेवा ही सर्वश्रेष्ठ असून ही सेवा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्यासारखी पारदर्शक असावी. संत श्री ज्ञानेश्वर माऊली व संत श्री निवृत्तीनाथ यांचे संदर्भ उदाहरण देवून ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के पुढे म्हणाले की, गुरू हा बुद्धीचा राजा असून गुरू व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जीवन जगत असतांना आपणास अनेक अडचणी येत असतात. परंतू या अडचणीतूनही सदाचाराचा मार्ग दाखविण्याचे काम आपले गुरू नकळतपणे करीत असतात त्याकरीता गुरूवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असून अनेकदा गुरू शिष्याची परिक्षा घेतो तेंव्हा शिष्याने त्या प्रसंगाला तन्मयतेने तोंड दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी संत नामदेव, ज्ञानेश्वरी माउली, जनाबाई यांच्या जीवनातील प्रसंग उपस्थितांना सांगितले.

कार्यक्रमास मौजे जवळगाव येथील ग्रामस्थांसह परिसरातील भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सादर केलेल्या घटनांनी भक्त भाविक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!