परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परळीचे आवघड महसुलायन

परळीचे आवघड महसुलायन: दोन महिन्यांत चार तहसीलदार; परळीत सातबारा दुरुस्ती रखडली : पुरवठ्याची डाटा एण्ट्री बंद


परळी वैजनाथ, प्रतिनिधी

तहसीलदार सुरेश शेजुळ यांची गेल्या दोन महिन्यांपुर्वी बदली झाल्यानंतर दोन महिन्यात चार तहसीलदार आले. यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरु असल्याने सातबारा दुरुस्तीसाठी लागणारी डिजिटल स्वाक्षरी नसल्याने तालुक्यातील 3 हजार शेतकऱ्यांच्या सातबारा दुरुस्तीचे रखडल्याने काम शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे रखडली आहेत.

परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांची दोन महिन्यापूर्वी अकलूज येथे बदली झाल्यानंतर आतापर्यंत चार तहसीलदार झाले आहेत. या पैकी कोणीच डिजिटल स्वाक्षरी बनवली नसल्याने सातबारा दुरुस्तीचे काम आहे. सुरेश शेजुळ गेल्यानंतर आईलनवाड यांनी काही दिवस कारभार पहिला व ते सेवानिवृत्त झाले.त्यांच्या नंतर १० दिवस नायब तहसीलदार अविनाश निळेकर यांनी कार्यभार घेतला व ते ही बदलीवर माजलगावला गेले.

त्यानंतर संदीप पाटील यांनी पदभार घेतला ते २५ दिवस राहिले त्या नंतर परत ते ही पोलिस प्रशासनात रुजू होण्यासाठी नाशिकला गेले.त्या नंतर तहसीलदार पेंदेवाड यांनी १५ ऑगस्ट पासुन पदभार घेतला आहे. परंतु वरील पैकी कोणीच एक महिना सुध्दा कायम राहिले नसल्याने डिजिटल स्वाक्षरी बनवली नाही. त्या मुळे परळी तालुक्यातील जवळपास तीन हजार सातबारा दुरुस्तीचे काम रखडलेले आहे.

पुरवठ्याची डाटा एण्ट्री बंद
     परळी वैजनाथ येथील पुरवठा विभागातील डेटा एन्ट्री सन २०१४ पासून बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच एपीएल,पीएचएच, एएवाय याबाबतीत अडचणी आहेत. परळी वैजनाथ येथील पुरवठा विभागाबाबत संबंधित यंत्रणेला माहिती विचारल्यावर अडीच महिन्यात कोणीच कोणती माहिती देऊ शकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!