शारदा नगरमध्ये सात दिवसांचे शिवलीलामृत पारायण उत्साहात

 शारदा नगरमध्ये सात दिवसांचे शिवलीलामृत पारायण उत्साहात 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील शारदा नगर भागातील हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त निर्मला पाठक यांच्या प्रेरणेने सात दिवसांचे शिवलीलामृत पारायण भक्तीभावाने संपन्न झाले.


शिवलीलामृत पोथी पारायण भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक- भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण, वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख, रोग, चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावणमहिन्याच्या पर्वकाळात शिवलिलामृत पोथीचे पारायण करण्याची मान्यता आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी पुढाकार घेऊन सात दिवसांचे पारायण केले.


या पारायणात निर्मला पाठक, लता अवचट, भाग्यश्री जोशी, विजया जोशी, जयमाला धारूरकर, विद्या शिंदे, ललिता नागरगोजे, सुमेधा चप्पे, अश्विनी बदने, मोहिनी चाटे, आशा स्वामी, गोदावरी खाकरे, शुभांगी स्वामी, शालन चौधरी, आशा बुरकुले, माई काजळे, महानंदा आघाव, छाया देशपांडे आदींनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !