इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथें भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे आयोजन

 तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथें भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे आयोजन




परळी वैजनाथ/ प्रतिनिधी :- आद्यवस्त्र निर्माता, शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा परळी वैजनाथ शहरातील संत श्री जगमित्र नागा मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन समस्त स्वकुळ साळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे .

भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दि. 29 ऑगस्ट 2023, श्रावण शुद्ध 13 रोजी संपूर्ण देशभरात श्री भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात,मध्य प्रदेश आदी राज्यातही आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र श्री भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा होत असतो.याच अनुषंगाने परळी शहरातील समस्त स्वकुळ साळी ( विणकर) समाज बांधवांच्या वतीने  संत श्री जगमित्र नागा मंदिर येथे  सकाळी सहाच्या सुमारास जन्मोत्सव,  महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, तदनंतर दुपारी महाप्रसाद, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि सायंकाळी आरती होऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष बालासाहेब पोरे सचिव नितीन भंडारे, विलास ताटे, धनंजय आरबुने, नारायण मानकर, नामदेव आरबुने, शिवाजी मांगलकर, गंगाधर इंगळे, विष्णू लिखे, सुरेश तरटे, नारायण ठोंबरे, संदीप बोनगे, शिवगण, अशोक लिखे, नवनाथ पोरे, श्रीनिवास लटंगे, आदीसह स्वकुळ साळी समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या