अभिष्टचिंतन लेख: ✍️ प्रा.शामसुंदर दासुद

■ 'भैय्या'- परळी शहराचे 'विकासदूत': उमदे व संवेदनशील मनाचे चतुरस्र युवा नेतृत्व: प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी 



आपल्या वर्तनातून, आपल्या कृतीतून ज्या व्यक्ती इतरांना प्रभावित करत असतात त्या व्यक्ती मानवी समाजात अगदी ठळकपणे उठून दिसतं असतात. सार्वजनिक जीवनात अनेक लोक काम करत असतात परंतु आपल्या कार्य कौशल्याने इतरांना प्रभावित करणारे अगदी मोजकेच असतात. अशाच प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले आमचे मित्र माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) परळी शहराचे शहराध्यक्ष आदरणीय बाजीराव  प्रकाशराव धर्माधिकारी.आज त्यांचा वाढदिवस त्या निमित्ताने केलेला हा शब्द प्रपंच.

समाजात काम करत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात बाजीराव भैयांनी ठळकपणे उठून दिसेल असे काम केले आहे.स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकहिताची कामे त्यांनी केलेली आहेत. परळी शहरासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, मागच्या दहा-अकरा वर्षापासून शासकीय रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी युवक अशा विविध स्तरातील गरजू लोकांसाठी या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा मदतीचा हात पोहोचलेला आहे. याबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ही त्यांनी केलेल्या कामाची नोंद परळी शहरातील सर्व स्तराच्या नागरिकांनी घेतलेली आहे.

  आधुनिक काळात राजकारण हे लोकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे त्यामुळे इतर कोणत्याही क्षेत्रात केलेल्या कार्यापेक्षा राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल समाज अधिक प्रकर्षाने घेत असतो. बाजीराव भैय्यांचे राजकीय क्षेत्रातील कार्यही याला अपवाद नाही. परळी शहराचं लाडक नेतृत्व राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांचे ते अगदी सुरुवातीपासून अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. ना. मुंडे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना नगराध्यक्ष म्हणून केलेले बाजीराव धर्माधिकारी यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. लोकांच्या कायम लक्षात राहणारे आहे. याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (संयुक्त राष्ट्रवादी) मागच्या सहा वर्षांपासून परळी शहराध्यक्ष म्हणून केलेले काम कौतुकास्पद आहे, नोंद घेण्यासारखे आहे. परळी शहरातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहरातील ताकद वाढवून ना.धनंजय मुंडे साहेबांचे हात बळकट करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची पावती म्हणजे मागच्या विधानसभेत ना धनंजय मुंडे साहेबांना मिळालेले घवघवीत यश आहे असे अनेक परळीकरांचे मत आहे.

    विद्यमान परिस्थितीत राजकीय समीकरणे बदललेली आहेत. पूर्वी संयुक्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेले बाजीराव भैय्या हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आहेत. आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष असलेली राष्ट्रवादी ही सेक्युलर राष्ट्रवादी म्हणून ओळखली जाते परंतु अजित दादांची राष्ट्रवादी ही भाजपाशी जवळीक असणारी राष्ट्रवादी मानली जाते. म्हणून बाजीराव भैय्या कडून या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पक्षाची ताकद पूर्वीपेक्षाही अधिक वाढवून ना. मुंडे साहेबांचे हात अधिक बळकट करण्याची अपेक्षा नेतृत्वापासून ते माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या पर्यंत सर्वांनाच आहे. सर्व जाती धर्मांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालण्याचे कौशल्य हे बाजीराव भैय्या यांच्यामध्ये आहे. त्याचा फायदा येणाऱ्या काळात निश्चितच पक्षाला होईल असा विश्वास आहे. दलित मुस्लिम कार्यकर्ते आणि मतदार यांच्याशी असणारी बाजीराव भैय्यांची जवळीकता ही या बदललेल्या परिस्थितीतही पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी मोलाची ठरणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व जाती धर्म आणि वर्गांच्या मतदार आणि कार्यकर्त्यांची ताकद ना धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागे उभी करण्यात बाजीराव भैय्या शंभर टक्के यशस्वी होतील यात तीळमात्र शंका नाही.

 सार्वजनिक जीवनात जीवन जगत असताना राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात उठून दिसणारे कार्य करणाऱ्या आदरणीय बाजीराव भैया धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त अगदी मनापासून शुभेच्छा.

आयुष्यवंत व्हा !

यशवंत व्हा !

कीर्तीवंत व्हा !

✍️-प्रा.शामसुंदर दासुद, परळी वैजनाथ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !