छायाचित्रकार नेमका कोण असतो?

 छायाचित्रकार नेमका कोण असतो?




#जोशींचीतासिका


असं म्हणतात एक चित्र हजारो, लाखो शब्दांपेक्षा सरस असतं. चित्र प्रकारात पेंटिंग, व्यंगचित्र, छायाचित्र असे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळे आपापल्या परीने तितकेच ताकदवान आहेत. थोडक्यात आपल्या भावनांना आणि आजूबाजूच्या परिसराला नेमकेपणाने त्याच्या नजरेतून टिपणारा एक जादूगार म्हणजे छायाचित्रकार.


आजही मी जेव्हा माझ्या घरी असलेला अल्बम उघडतो तेव्हा तो काळ नजरेसमोर वेगवेगळ्या भावभावनांना सोबत घेऊन एक भावविश्व उभे करतो. सर्व प्रथम माझे ज्यांनी ज्यांनी आजवर छायाचित्रे काढले असतील त्या ज्ञात अज्ञात मंडळींना त्या अनमोल ठेव्यासाठी प्रणाम व धन्यवाद.


व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून शिवसेना नावाचा अंगार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातला. तितकीच ताकद छायाचित्रात असते. हिरोशिमा नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने झालेले जागतिक परिणाम विषद करायला एकचं छायाचित्र पुरेसं होतं.


वेगवेगळ्या आंदोलनात एक क्षण असा असतो जो कॅपचर करायला अख्ख आयुष्य पणाला लावणारे छायाचित्रकार होऊन गेले. खासकरून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तर कमालीचे धाडसी आणि तितकेच संयमी म्हणावे लागतील.


आजच्या काळात मोबाईल क्रांतीने फोटोग्राफर मंडळी अडचणीत आहेत. पण, त्याचवेळी प्री वेडिंग शूट सारखे नवीन प्रकार जन्माला येत आहेत ज्यामुळे फोटोग्राफर कसेबसे तग धरुन आहेत.


एक खंत आज फोटोग्राफी व्यवसायात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे मांडावी वाटते. उदाहरणादाखल सांगायचे तर एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी फोटोग्राफर त्या व्यक्तीच्या यंत्रणेने बुक केला तर ती यंत्रणा त्या फोटोग्राफरला कधी पैसे देईल याची निश्चिती नसते कारण ते लोक प्रिंट्स घेतच नाहीत आणि बातम्यांसाठी तत्काळ डिजिटल प्रिंट मागवून घेतात. मग फोटोग्राफरला त्याच्या हक्काच्या पैश्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. दरम्याम अवहेलना, मनस्ताप सहन करत पोटासाठी त्यांच्याच नवीन ऑर्डरस स्वीकाराव्या लागतात.


सोबतच त्या राजकीय व्यक्तीचे चेलेचपाटे आपला फोटो त्यांच्या साहेबासोबत आला असावा म्हणूण त्या छायाचित्रकाराला फोन करून भांडवून सोडतात. इतकंच नाही तर त्या फोटोत हा का आला? तो का आला नाही? म्हणून तंडत असतात. विशेष म्हणजे या महाभागांना डिजिटल प्रिंट फुकटात हव्या असतात. यापुढे त्या फोटोग्राफरमे फोटो प्रिंट देऊनही ते कानफुंके लोक्स नेते मंडळींना सांगत असतात 'साहेब, आपल्यामुळे तो आहे तरी तो आम्हांला फोटो देत नाहीत, मी माझ्या ओळखीचा फोटोग्राफर आणतो'.


हे फक्त राजकीय उदाहरण दिले, असे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात होत असते. लग्न समारंभात ऑर्डर देणारी व्यक्ती अमक्या आत्याचा, तमक्या मामाचा फोटो आला नाही म्हणून तंडत बसते. बरं तुम्हांला काय अपेक्षित आहे हे ऑर्डर देणाऱ्यालाही ठाऊक नसतं.


थोडक्यात तुमच्या आमच्या भावभावनांना अपार मेहनतीने मोठेपणा प्राप्त करून देणाऱ्या छायाचित्रकारांना वेळेवर योग्य तो ठरलेला मोबदला देऊन सन्मान देणे हे आपले कर्तव्य आहे असे मला आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सांगावेसे वाटते.


सोबतच्या छायाचित्र जोडलेल्या व त्यात नसलेल्या माझ्या परळी वैजनाथमधील तसेच सर्व ठिकाणच्या ऊन, पाऊस, थंडीत काम करणाऱ्या सर्व छायाचित्रकार मंडळींना मनःपूर्वक शुभेच्छा.


जय हिंद,

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

चलभाष क्र. 8983555657

दि. 19 ऑगस्ट 2023


#worldphotography #WorldPhotographyDay #WorldPhotographyDay2023

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार