प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची अशी बैठक घेणारे मुंडे पहिलेच कृषीमंत्री

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी साधला विविध पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद


तुमच्या अनुभव व सूचनांचा लाभ अन्य शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी सतत मार्गदर्शन करत रहा - धनंजय मुंडे


प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची अशी बैठक घेणारे मुंडे पहिलेच कृषीमंत्री


मुंबई (दि. 29) - विविध शासकीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आणि सूचनांचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. अनुभवी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील अन्य शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी केली.


कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात विविध पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रगतशील व वेगवेगळे पुरस्कार प्राप्त असलेल्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन अशा पद्धतीने संवाद साधून शेतकऱ्यांच्या आधुनिकतेचा फायदा अन्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पुढाकार घेणारे धनंजय मुंडे हे पहिलेच कृषीमंत्री असावेत!


यावेळी शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करावी, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावे, कृषी विभागाच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण करावे, पुरस्काराच्या रकमेत वाढ करावी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतीच्या कामांची संख्या वाढवावी, पिक विमा योजनेतील तालुका,जिल्हा व राज्यनिहाय तक्रार समित्यांवर शेतकऱ्यांची नियुक्ती करावी, शेतजमिनी मधील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे तो वाढवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केल्या. यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कोविड व इतर कारणांमुळे रखडलेले पुरस्कारांचे वितरण लवकरच केले जाणार असल्याचे जाहीर केले तसेच कृषी विभागाशी संबंधित सर्व मागण्या सकारात्मकपणे विचारात घेतल्या जातील तसेच इतर मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.


याप्रसंगी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सर्व कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रतिनिधी यांची चारही विद्यापीठांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व कुलगुरू, कृषी आयुक्त यांच्या समवेत एक राज्यस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकाना दिले.


या बैठकीस कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव गणेश पाटील, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर देशमुख, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रकाश पाटील, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त विजय चौधरी, कृषी भूषण नाथराव कराड, पंडित दीनदयाळ पुरस्कार प्राप्त प्रल्हाद वरे, कृषीरत्न संजीव माने, राजेंद्र गायकवाड,  कृषीभूषण यज्ञेश सावे, शेतीमित्र वालचंद धुनावत, कृषीभूषण मच्छिंद्र कुंभार तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बीजोत्पादन अधिकारी उदयकुमार काचोळे, मृद रसायनशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. अमोल मिसाळ, डॉ भरत वाघमोडे, डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार