उपस्थित राहण्याचे आवाहन

 खा.शरदचंद्र पवारांच्या स्वाभिमान सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा - अॅड. जिवनराव देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठा गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी सभा घेत आहेत. बीड शहरामध्ये गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी शरद पवार  यांचे हात बळकट करण्यासाठी स्वाभिमान सभेला सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. जिवनराव देशमुख यांनी केले आहे.


बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच ग्रामीण भागात आदरणीय साहेबांच्या स्वाभिमानी सभे बाबत उत्साह आहे. युवक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक असे सर्वच आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व फक्त शरद पवार साहेबांनीच करावे अशी भावना जनमानसाची आहे. या स्वाभिमान सभेचे आयोजन बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्ह्याचे लोकप्रिय अध्यक्ष तथा विधानसभा सदस्य संदीप भैया क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख मा. आमदार सय्यद सलीम मा. आमदार उषाताई दराडे मा. आमदार पृथ्वीराज साठे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते आजी-माजी आमदार प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत परळी मतदारसंघातून ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई गुट्टे ज्येष्ठ नेते समदभाई शेठ यांच्या मार्गदर्शनाने सभेची तयारी चालू आहे. या ऐतिहासिक सभेमध्ये शरद पवार साहेब काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये होत असलेल्या स्वाभिमान सभेसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. जिवनराव देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार