मोहनलाल बियाणी यांच्या जयंतीनिमित्त चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केलेल्या शब्दबद्ध भावना:आई-वडिल हेच आमचे 'विद्यापीठ ' आणि 'साथी' !

 आई-वडिल हेच आमचे 'विद्यापीठ ' आणि 'साथी' !


         म्ही आज जे काही आहोत आणि यापुढे जे काही असणार आहोत याचे सर्व श्रेय हे आमच्या आई-वडिलांना जाते. एक प्रकारे आमच्या परिवारासाठी आमचे आई-वडील हेच 'विद्यापीठ' असून दैनिक मराठवाडा साथीच्या माध्यमातून झालेली जडणघडण, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, बँकिंग क्षेत्रात आम्ही करत असलेले काम या सर्वांच्या मुळाशी खरेखुरे 'साथी" असलेले आमचे आई-वडील हेच आमच्या जडणघडणीचे खरे शिल्पकार ठरतात.आमचे पिताश्री मोहनलालजी बियाणी यांची आज जयंती.त्यानिमित्ताने त्यांच्या संस्कार व विचारावरच ही वाटचाल पुढे अविरत सुरु ठेवण्याचा पुन्हा एकदा संकल्प आहे.
       शिका, शिक्षणाचा उपयोग लोककल्याणासाठी करा,सामाजिक दायित्व निभवा, माणुसकीच्या भावनेतून माणसं जोडा,जे जे उदात्त व उन्नत ते स्विकारा, सत्यमार्गावर चालताना संघर्ष आला तर डगमगून जावू नका धैर्याने वाटचाल करा असा मंत्र आमचे वडील मोहनलाल बियाणी (काकाजी )यांनी सदैव दिला.यामुळेच मी चंदुलाल ,माझे भाऊ सतीश ,जगदीश बियाणी  व छाया बियाणी -धुत  बहीण असे आम्ही बहिण भावंड  शिकलो आणि घडलो.आई राधाबाई यांचे अध्यात्मिक , चांगले संस्कार आमच्या कुटुंबावर व परिवारावर झाले.आई- वडिलांमुळे आमच्या परिवाराचा  संसार फुलला व सामाजिक जीवन बहरलेआहे.

  परळी आणि ग्रामीण भागात शिक्षक म्हणून काम केलेले मोहनलाल बियाणी  हे परळी शहरात काकाजी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आधी प्रिंटिंगचा व्यवसाय व नंतर दैनिक मराठवाडा साथी वृत्तपत्र सुरू केले. त्याकाळी आमची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती तरीही त्यांनी आम्हाला शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायासाठी पाठबळ दिले.


    उद्योगशिलतेला प्रोत्साहित केले.वेळोवेळी मार्गदर्शन केले. सहकार्य केले. राजकारण, समाजकारण करीत असताना ओढवलेल्या संघर्षात त्यांनी खंबीर राहून साथ दिली.धैर्याची शिकवण दिली. त्यामुळे आमच्या आई राधाबाई बियाणी यांनी परळीचे  दोन वेळा नगराध्यक्ष पद भूषविले आणि मी तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. काकाजी हे राजस्थानी सहकारी पतपेढी चे संस्थापक होते. त्यांच्यामुळे आम्हालाही सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.  मोहनलाल बियाणी  हयात असतानाच राजस्थानी मल्टीस्टेटची आपण स्थापना केली.चेअरमन झालो आणि आज राजस्थानी मल्टीस्टेट महाराष्ट्रात 36 शाखा यशस्वीपणे मध्ये घोडदौड  करीत आहेत. लवकरच कर्नाटकामध्ये राजस्थानी मल्टीस्टेटचा शाखा विस्तार  होणार आहे. 


       राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसच्या विस्ताराची जबाबदारी घेतली व आज महाराष्ट्रात मोठ्या शहराच्या ठिकाणांपासून ते शहरात सर्वत्र बन्सल क्लासेसचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.वडिलांनी सुरू केलेले  दैनिक मराठवाडा साथी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात गेल्या 42 वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. व्यावसायिक पातळीवर आज आम्ही विविध व्यावसायिक काम करत आहोत.सामाजिक उपक्रम असो की जनकल्याणाचे कार्यक्रम यात यथाशक्ती अग्रणी राहून काम करण्याचाच आमचा प्रयत्न असतो.हे सर्व  मोहनलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रेरणेमुळे सुरू आहे.

      
       मोहनलाल बियाणी ,राधाबाई बियाणी या आई-वडिलांमुळे आम्ही चंदुलाल ,सतीश , जगदीश , छाया या चार बहीण भावंडांचा परिवार फुलला आहे. मुले, मुली,सुना ,जावई ,नात ,नातू यांना आजही आईचे  आध्यात्मिक विचार, धार्मिक कार्यात सहभाग घेण्यास मार्गदर्शक ठरतात.  मोहनलाल बियाणी यांची आज जयंती. त्यांच्या विचारावरच सर्व कार्ये चालू आहेत. ज्या आई-वडिलांच्या भक्कम साथी मुळे आम्ही  घडलो आणि  वाढलो तेच आमच्यासाठी 'विद्यापीठ ' आणि अखंड 'साथी' असतील.त्यांच्या संस्कार व विचारावरच ही वाटचाल पुढे अविरत सुरु ठेवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.

    ✍️ -चंदुलाल  बियाणी,

  अध्यक्ष राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी

..........





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !