अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किसान सभेची मागणी

 अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किसान सभेची मागणी


●खरीप पीक कर्ज माफी व पीक विमा अग्रीम देण्यासाठी करणारा आंदोलन


परळी / प्रतिनिधी


खरीप पिकांचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे खरीप पीक कर्ज माफ करण्यात यावे यासह 

शेतक-याना तातडीने दिलासा देण्या-या विविध मागण्या घेत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या परळी शाखेच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर सोमवार दि 21 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.


बीड आणि परळी तालुक्यातील पर्जन्यमान पाहता मान्सूनचा निम्मा काळ लोटला असून देखील सरासरीच्या निम्मा पाऊस देखील झालेला नाही.खरिपाची लागवड झालेले परळी तालुक्यातील 51 हजार 800 हेक्टर वरील पिके धोक्यात आहेत. अद्याप देखील समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळी सावट माथ्यावर गोगावत असताना शेतक-यांच्या प्रश्नी सातत्याने लढत असलेल्या किसान सभेने या प्रश्नी पुनः पाऊले उचलली असून परळी तालुका दुष्काळ जाहिर करण्याच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने संबंधीत अहवाल शासनास सादर करून पाठवावा करावा, अवर्षण ग्रस्थ शेतक-याचे खरीप पिक कर्ज माफ करावे,खरीपाचे पिकाची नुकसान झाल्यामुळे पिक विम्याची ५०/टक्के आग्रीम रक्कम शेतक-याच्या खात्या मध्ये जमा करावी,सन २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित शेतक-यांना अनुदानाचे वाटप करावे. सन २०२० चा मंजुर पिक विमा त्वरीत वितरीत करावा.परळी तालुक्यात लंपी स्किन रोगाचे लसी करण युध्द पातळीवर करुन पशु संपत्ती वाचवावी, दुष्काळी परिस्थितीत शेतक-याना शासनाने तातडीने मदत घोषीत करावी.या सह इतर मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभा सोमवार दि. 21 रोजी ठीक 12 वा तहसील कार्यालयासमोर  शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभेचे परळी तालुका अध्यक्ष कॉ.भगवान बडे,कॉ.मुक्तेश्वर कडभाने व इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार