दोघांचा जागिच मृत्यू ,सहा गंभिर जखमी ,गाडीचा चक्काचूर

 मोहटा देविच्या दर्शनासाठी चाललेल्या गाडीचा भिषण अपघात 



दोघांचा जागिच मृत्यू ,सहा गंभिर जखमी ,गाडीचा चक्काचूर 



शिरूर कासार : तालुक्यातील तांगडगांव येथील एक कुटूंब मोहटा देवीच्या दर्शनाला जात असतांना मानूरच्या पुढे साधारण एक किलोमिटर अंतरावर शेंदूरकर यांचे घराजवळ गाडीचा भिषण अपघात झाला त्यात गाडीचा चक्काचूर झाला तर दोघाचा जागिच मृत्यू झाला तर अन्य सहा गंभिर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी बीड शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आले .घटना स्थळी पोलीस हजर झाले ,पंचनामा केल्यानंतर मयताचे शवविच्छेदन प्राथमीक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ प्रगती पवळ यांनी केले ,मयताचा भाऊ कृष्णा अंबादास नाईकनवरे यानी पोलीसात खबर दिली .

ऊसतोड मजुर म्हणून काम करत असलेले नाईकनवरे कुटूंब शुक्रवारी मोहटा देवी दर्शनासाठी ईंडीका व्हिस्ट गाडी घेऊन जात असतांना सकाळी अकराच्या सुमारास भरधाव वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने झाडावर धडकली त्यात गाडीचा चक्काचूर झाला ,गाडी चालवत असलेले गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे वय ४० वर्ष यांचेसह त्यांची आठ महिण्याची भाची दिव्या आदिनाथ मडके रा. देवी निमगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर मयताची आई लताबाई अंबादास नाईकनवरे वय ६०वर्ष  ,पत्नी  उषाबाई गोकुळ नाईकनवरे वय ३५ वर्ष ,दादा गोकुळ वय १४ वर्ष ,प्रगती गोकुळ वय १५ वर्ष ,कोमल आदिनाथ मडके वय २४ मयत बाळाची आई देवीनिमगांव व बाळू मच्छिंद्र सटले वय १८ वर्ष रा. जोडवाडी मयताचा भाचा हे सर्वजन गंभिर जखमी झाले असुन त्यांना तातडीने बीडला शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे .

अपघात घडला नेमके त्यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रेनी पी एस आय भाऊसाहेब शिरसाट शिरूरला येत होते ,त्यामुळे पुढील सुत्र तातडीने हालले ,अपघात स्थळी पोलीस निरिक्षक धोकरट भेट दिली सोबत पोलीस जमादार सतिष राऊत ,माने होते .खबरीवरून अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास पोलीस करणार आहेत .ऊसतोड मजुराचे कुटूंबच या संकटात सापडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार