इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

शरद पवार विचार मंचाची मागणी

 त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपी दर्शन बंद करा : श्रीनिवास देशमुख




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.


शासकीय सुट्या आणि त्यानंतर श्रावण पर्वकाळासाठी होणारी गर्दी पाहता दि. १२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपींना दर्शन दिले जाणार आहे.


सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात २०० रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. त्र्यंबकेश्वर येथे दररोज १५ हजार भाविकांचे दर्शन होत असते. अवघे चार सेकंद एका भाविकाला मिळतात. त्यात व्हीआयपी आल्यास आणखी पंचाईत होते यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे.


त्याच धर्तीवर परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!