रक्तदान शिबिरात तब्बल १०५ दात्यांचे रक्तदान !

 माजी नगराध्यक्ष बाजीराव  भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १०५ दात्यांचे रक्तदान !



🕳️ रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान




परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......


    कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला  दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या  शिबिरात तब्बल १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

       राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, रा.काॅ.जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, डाॅ.जे.जे. देशपांडे, डाॅ.सुरेश चौधरी, शरदराव कुलकर्णी, भालचंद्र तांदळे, प्रभाकरराव देशमुख, नारायणदेव गोपनपाळे, रघुनाथराव कावरे, अरुण टिंबे,  वैजनाथ बागवाले, रमेश चौंडे, अनिल आष्टेकर, महाविर संघई, जयराज देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.हे रक्तदान शिबिर परळीत गावभागाची एक परंपरा बनली आहे.          

        दरवर्षी वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे. यावर्षीही या शिबिरात रक्तदात्यांची उत्स्फूर्तता मिळाली. 

         स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डाॅ.आनंद सिताप, डाॅ.धर्मराज पवार, आदित्य केशवाणी, गुंगेवाड, शशिकांत पारथे, शेख बाबा,कुंजटवाड, वाहनचालक इशरत अली आदींनी या शिबिरात रक्तदान प्रक्रिया पार पाडली.या शिबिरात तब्बल १०५ रक्तदात्यांनी रक्तदान  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन स्वामी यांनी केले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाने परिश्रम घेतले.


■  वैद्यनाथाला अभिषेक, अन्नदान, शालेय साहित्य वाटप



       बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाने बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले.रक्तदान शिबिरासह अन्य उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथास अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानबोधिनी शाळा कृष्णानगर, गणेशपार, महाराष्ट्र इंग्लिश स्कुल, कृष्णाबाई देशमुख विद्यालय, डाॅ. झाकिर हुसेन शाळा बंगला आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे अन्नदान करण्यात आले. तसेच परळीतील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये मिष्टान्न वितरण करण्यात आले. या उपक्रमांच्या यशस्वितेसाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार