परळीच्या संगीत क्षेत्राचा सर्वोच्च गौरव

 परळीच्या संगीत क्षेत्राचा सर्वोच्च गौरव: भक्ताश्रमच्या गणेशअण्णा चौधरी व सतीशचंद्र चौधरी यांना अ.भा. गांधर्व मंडळाचा मरणोत्तर संगीत रत्न आणि कलागौरव पुरस्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       परळी शहराचे संगीत क्षेत्रात गौरवशाली नावलौकिक करणारे परळीतील भक्ताश्रमाचे संस्थापक कै. गणेशअण्णा चौधरी व त्यांचा वारसा पुढे चालवणारे कै. सतीश चंद्र चौधरी यांना अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने दिला जाणारा संगीत क्षेत्रातील गौरवाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अ.भा. गांधर्व मंडळाच्या मरणोत्तर संगीत रत्न आणि कला गौरव पुरस्कारासाठी झालेली ही निवड खरोखरच परळीच्या संगीत क्षेत्राचा मोठा सन्मान आहे.
          परळी नगरीतील भक्ताश्रम हे संगीत साधनेचे एक मौलिक संस्थान आहे. या संस्थांनाचे सर्वेसर्वा शास्त्रीय संगीताचे साधक आणि उपासक कै. अण्णासाहेब चौधरी हे संगीत क्षेत्रातील एक  बडे प्रस्थ होऊन गेले.त्यांनी केलेली संगीत सेवा ही अखिल भारतीय पातळीवर गौरविली गेलेली आहे.
स्व.अण्णांचे जेष्ठ चिरंजीव कै.सतीशचंद्र चौधरी यांनी सुद्धा तबलावादनातील तालयात्री म्हणून केलेली संगीत सेवा ही राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवून गेली.परळीच्या या दोन महान संगीतसाधक  पिता पुत्राला  "अखिल भारतीय गांधर्व मंडळाकडून " स्व. पं. विष्णु दिगंबर पलूस्कर संगीत कलागौरव पुरस्कार जाहीर झाला. त्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले.
        शास्त्रीय संगीत सेवेला वाहून घेतलेल्या निष्काम आणि निरपेक्ष सेवाव्रत्तीचे जगणेच मुळात हे चिरंतन सेवाभाव संजीवन रहावा यासाठी असते.स्व. अण्णासाहेब आणि स्व. सतीशजी हे संगीत सेवेला स्वतः वाहून घेतलेले समर्पित भाव होते. त्यांचा अखिल भारतीय गांधर्व मंडळाकडून  होणारा मरणोत्तर गौरव परळीसाठी अभिमानास्पद ठरणारा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !