इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंतीनिमित्त भव्य नोकरी महोत्सव

 राज्यातील हजारो तरुण - तरुणींना मिळणार नोकरी


मराठवाडा साथी व राधा - मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग


छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी)

राज्यभरातील लाखो सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे आपण पाहत आहोत. वेगेवगल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही. परंतु आता अशा तरुण वर्गासाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. दैनिक मराठवाडा साथी आणि राधा - मोहन साथी प्रतिष्ठानकडून दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्त भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच महिन्यातील दि.24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), दि.25 सप्टेंबर रोजी लातूर तर दि.26 सप्टेंबर रोजी नांदेड अशा मराठवाड्यातील प्रमुख शहरांत हा नोकरी महोत्सव जीआरबी सोल्युशन्स पुणे या कंपनीच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नगर, नाशिक, संभाजी नगर आदी ठिकाणच्या नामवंत कंपन्यांचा यात सहभाग असणार आहे. या नोकरी महोत्सवामुळे राज्यभरातील हजारो सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळणार असल्याचा विश्वास मराठवाडा साथीचे संपादक तथा राधा - मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केलाय.


दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी यांच्या जयंतीच्या औचीत्यावर दैनिक मराठवाडा साथी व राधा - मोहन साथी प्रतिष्ठान कडून भव्य नोकरी महोत्सव जिआरबी सोल्युशन्स,पुणे या कंपनीच्या सहकार्यातूनआयोजित करण्यात आला आहे. दि.24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), दि.25 सप्टेंबर रोजी लातूर तर दि.26 सप्टेंबर रोजी नांदेड येथे हा नोकरी महोत्सव संपन्न होईल. राज्यभरातील कुठल्याही तरुणांना यात सहभागी होता येऊ शकते. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातील 35 नामवंत कंपन्या यात सहभागी होणार आहेत. म्याण्युफॅक्चरींग, आयटी, बँकिंग, फायनान्स, रिटेल, फार्मसी, बिपिओ/ केपिओ, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, इन्शुरन्स, ऑटोमोबाईल, टेलिकॉम आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तरुणांसाठी नोकरी देण्यास तयार आहेत. यामुळे संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील हजारो युवक - युवतींना नोकरी मिळणार आहे. या नोकरी महोत्सवात नोकरी न मिळाल्यास सहभागी उमेदवारांना एक जॉब कार्ड देण्यात येणार असून, पुढील वर्षभरात प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक तीन दिवसांतून त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर इतरत्र उपलब्ध नोकरी संधि च्या माहितीचा मेसेज केला जाणार आहे. रिकाम्या हाताला काम आणि सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देणे असा आमचा उद्देश असल्याचे चंदुलाल बियाणी यांनी सांगितले आहे.

नोकरी ची आता चिंता नाही

मराठवाड्यातील प्रमुख तीन शहरांत आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र सहभागी झाल्यानंतरही जर नोकरी नाही मिळाली तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही, अशा तरुणांना एक जॉबकार्ड देण्यात येणार आहे. ज्याद्वारे पुढील वर्षभरात प्रत्येक आठवड्यातील तीन दिवसांतून त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर विविध क्षेत्रांत उपलब्ध संधिनुसार माहितीचा मेसेज केला जाणार आहे. ज्यामुळे आता चिंता न करता पुढील वर्षभरात हमखास नोकरी मिळेल या विश्वासाने तरुणांना यात सहभागी होता येईल.

जी आर बी सोलुशन पुणे या संस्थे च्या सहकार्याने आयोजित नोकरी महोत्सवाची वैशिष्ट्ये

🔸 12 वर्षाचा नोकरी महोत्सवाचा प्रदीर्घ अनुभव.

🔸 आत्तापर्यंत 100 पेक्ष्या अधिक यशस्वी नोकरी मेळाव्यांचे आयोजन.

🔸 550 पेक्ष्या अधिक कंपन्यांसोबत नोकरभरती विषयक करार.

🔸 आत्तापर्यन्त 1 लाखाहून अधिक बेरोजगार युवक-युवतींचा नोकरी मेळाव्यांमध्ये सहभाग.

🔸 50000 हजार पेक्ष्या जास्त युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी.


👉🏻 नोकरी मेळाव्यात महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपन्यांचा सहभाग

👉🏻 मेळाव्यात येणाऱ्या एकूण युवका युवती पैकी 50% नोकरी देण्याची हमी.

👉🏻 5 वी पास पासून उच्च पदवीधर पर्यंत सर्वाना नोकरी.

👉🏻 महिला, अपंग याच्यासाठी विशेष सवलत.

..........





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!