जि प प्रा शा संगम शाळेत शालेय गणवेशाचे वाटप


 परळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम येथे आज शाळेतील सर्व मुली सर्व मुले यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगम गावचे सरपंच अच्युतराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून गटसाधन केंद्राचे लेखा सहाय्यक श्री बाळासाहेब बोंदर साहेब , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथराव नागरगोजे व  शिक्षणप्रेमीअंकुशराव गिराम यांच्यासह मुख्याध्यापक अशोक नावंदे सर उपस्थित होते. यावेळी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व मुली , अनुसूचित जाती/जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील  विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले होते परंतु शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संगम गावचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीने च्या मदतीने शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार व शासनाने विहित केलेले गणवेश वाटप करण्यात आले,यावेळी शिक्षक वर्ग सर्वश्री महादेव गीते सर श्री सुभाष कोंकेवाड सर श्रीम. कल्पना बडे मॅडम श्रीमती बबिता शिंदे मॅडम  यांच्यासह  विद्यार्थी उपस्थित होते .सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

प्रास्तविकात मुख्याध्यापक अशोक नावंदे यांनी शाळेच्या आवश्यक भौतिक सुविधा बाबत मागणी करून शाळा राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी गटसाधन केंद्राचे लेखा सहाय्यक श्री बाळासाहेब बोंदर यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून शाळेसाठी संगणक व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यालय सर्वोतोपरी सहकार्य करील असे सांगून शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक केले. 

सुत्रसंचलन श्री महादेव गित्ते सर यांनी तर आभार श्री सुभाष कोंकेवाड सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !