परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

 अथक परिश्रमाला पर्याय नाही, परिश्रम व आत्मविश्वासा शिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही -तहसीलदार संदीप पाटील


लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन


परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)

             ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक आहे. अथक परिश्रमाला पर्याय नाही, परिश्रम व आत्मविश्वासाशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही.स्पर्धा परीक्षेत सर्वांना समान संधी असते. मोबाईलचा वापर कमीत कमी करा असे प्रतिपादन तहसीलदार संदीप पाटील यांनी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

       शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उद्घाटन समारोह मंगळवारी (ता.०८) सकाळी १० च्या सुमारास संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती प्रतिमा पूजना झाली. कार्यक्रमासाठी तहसीलदार संदीप पाटील हे उद्घाटक लाभले.तर संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे,स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा.डॉ. विनोद जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी केले. उद्घाटक तहसीलदार संदीप पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करून एक प्रकारे उदात्त ध्येयासाठी पहिले पाऊल उचलल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. शिक्षण देणारी वास्तु पवित्र असते, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा, वक्तृत्व कलेत पारंगत व्हा, पूर्वपरीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा स्पर्धा परीक्षांच्या तीन पायऱ्या असतात. सर्वांनी बोलायला शिकले पाहिजे.शिकलेली गोष्ट मैत्रीणीला सांगा म्हणजे बोलण्याचा सराव होईल असा कानमंत्र त्यांनी दिला. न समजलेली गोष्ट विचारत जा शंकांचे समाधान करून घेत जा. दहावीपर्यंत वाचलेल्या गोष्टी पुन्हा एकदा वाचून त्याचा सारांश काढा . तोच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे असेही श्री.पाटील यांनी सांगितले. आपण जे वाचतोय ते आपल्याला समजलंय का ते पहा.ध्येय प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.

परीक्षा महत्वाची पण परीक्षेसाठी काय महत्वाचं हे विसरता कामा नये याची जाणीवही त्यांनी करून दिली.अभ्यासासाठी प्रामाणिक रहा,हवेत राहू नका हे मी अनुभवातून सांगतो असे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे म्हणजे अभ्यासात सातत्य असावे असा मूलमंत्र त्यांनी दिला.ध्येय ठरवा तयारीला लागा.कृती करण्याने स्वप्नं पूर्ण होतात केवळ बोलण्याने नव्हे.रोज स्वतःला तपासा किती अभ्यास केला असे ते म्हणाले.मोबाईल जीवनाचे साधन आहे साध्य नव्हे अशी जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.विद्यार्थी अवस्थेच्या संधीचे सोने करा. ध्येय उदात्त ठेवा. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना प्रा प्रसाद देशमुख यांनी  सामाजिक दायित्व जाणणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे असे विचार मांडून आवडीच्या क्षेत्रात अग्रेसर व्हा. असे प्रतिपादन केले .

 या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा प्रवीण फुटके यांनी केले तर प्रा डॉ. आर.के. यल्लावाड यांनी आभार मानले .या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी, पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!