जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणारी सभा

 जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणाऱ्या बीडच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ(दि. 26) - रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड शहरात होत असलेली सभा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा आहे.या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे.अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड जिल्हा उत्सुक आहे.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

      बीड येथे रविवारी दि.27 रोजी दुपारी 3 वा. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री कु. आदीतीताई तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांसह जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय व मान्यवरराष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत  जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पवार व मंत्रिमंडळातील सर्वच सदस्य प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. 

       तरी परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने या अस्मितेच्या व जिल्ह्याच्या सन्मानाच्या सभेला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार