अजय मोगरकर यांची सर्वानुमते निवड

 लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अजय मोगरकर यांची सर्वानुमते निवड




परळी वैजनाथ

49 वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अजय मोगरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गणेशपार विभागात मागील 49 वर्षांपासून अखंडितपणे लोकमान्य गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते. लोकमान्य गणेश मंडळातर्फे दरवर्षी रक्तदान, शालेय स्पर्धा, व्याख्यान, वृक्षारोपण, स्वछता मोहीमेसह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. लोकमान्य गणेश मंडळास यापूर्वी स्थायी देखावा व मिरवणुकीत अनेक बक्षिसे मिळाली आहेत. समाजप्रबोधन, ऐतिहासिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर देखावा सादर करण्यासाठी लोकमान्य गणेश मंडळ ओळखले जाते.मंडळाच्या सदस्यांची सोमवार दि 12 सप्टेंबर रोजी मंडळाचे मार्गदर्शक अश्विन मोगरकर, विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत नूतन कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्षपदी अजय मोगरकर, उपाध्यक्ष म्हणून नागेश स्वामी तर सचिव पदी आकाश सोवितकर यांची निवड करण्यात आली. याही वर्षी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने तसेच विविध स्पर्धा, समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याचा मानस नूतन अध्यक्ष अजय मोगरकर यांनी बैठकीत मांडला. या बैठकीत लोकमान्य गणेश मंडळाच्या नूतन कार्यकारीणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली. अध्यक्ष अजय मोगरकर, उपाध्यक्ष नागेश स्वामी, सचिव आकाश सोवितकर, कोषाध्यक्ष हर्ष आरबोने सदस्यपदी विक्रम स्वामी, रोहित सारस्वत,प्रणव स्वामी, विजय मोगरकर,शिवराम जोशी,सागर जोशी,अनुराग स्वामी,अभिषेक हलगे,मयूर हलगे,महेश हलगे,ऋतिक संघई, अथर्व जबदे,सचिन झाटे, ज्ञानेश्वर पवार,गणेश कोडी,गणेश साखरे,प्रमोद दहातोंडे,केदार सोणवळे, शिवदीप स्वामी, अभय नावंदर, रोहित हलगे, लहु हालगे,मंगेश स्वामी, रमण नावंदर तर मंडळाचे मार्गदर्शक म्हणून अश्विन मोगरकर, विजय जोशी, महावीर संघई, सचिन स्वामी, संतोष नावंदर, धनंजय स्वामी, रुपेश हलगे,सतीश मानधने,रमेश पवार यांची निवड करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार