गौरी गणपती सणाचा आनंदाचा शिधा

 परळी तालुक्यातील सुमारे पन्नास हजार कार्डधारकांना मिळणार गौरी गणपती सणाचा आनंदाचा शिधा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       गौरी गणपती सणाच्या निमित्ताने शासनाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा चे किट उपलब्ध झाले असून परळी वैजनाथ तालुक्यातील जवळपास 50 हजार कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. संबंधित सर्व रेशन दुकानदार यांच्याकडे पुरवठा विभागाने हे किट उपलब्ध केले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार परळी वैजनाथ यांनी केले आहे.
            शासनाने दिनांक 24/08/2023 चे परिपत्रकान्वये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गौरी गणपती  सणानिमित्त प्रत्येकी 01 किलो या परिमाणात रवा, चणादाळ, साखर व 01 लिटर पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा रु.100/- प्रतिसंच वितरीत करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने  जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी दिनांक 25/08/2023 चे पत्रान्वये परळी-वै तालूक्यातील प्राधान्य, अंत्योदय व शेतकरी कार्डधारकांची संख्या विचारात घेवून शासकीय धान्य गोदाम, परळी-वै.एकूण कार्ड 37075 उपलब्ध संच 35223, शासकीय धान्य गोदाम, सिरसाळा एकूण कार्ड 14820 उपलब्ध संच 14081 असे एकूण कार्ड 51895 उपलब्ध संच 49304 आनंदाचा शिधा मंजूर केलेला आहे. शासनाने गौरी गणपती सणानिमित्त मंजूर केलेली वरील प्रमाणे कार्डधारकांसाठी असलेली कीट परळी वै. तालुक्यातील संबंधित रास्त भाव दुकानदाराकडून ई-पॉज मशीनवर आंगठा लावून यावी असे आवाहन तहसिलदार परळी-वै यांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !