छत्रपती संभाजीनगर येथे उद्या मंत्रीमंडळाची बैठक

 छत्रपती संभाजीनगर येथे उद्या मंत्रीमंडळाची बैठक


छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळाच्या शनिवारी (दि. 16) होणाऱ्या बैठकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. या बैठकीसाठी वाहन, हॉटेल्स, विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.
        मंत्र्यांचा लवाजमा येत असल्यामुळे त्यांच्यासाठी रामा इंटरनॅशनल आणि ताज या हॉटेल्समधील खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने विश्रामगृहांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री, त्यांचे स्वीय सहायक, विशेष कर्तव्य अधिकारी यांच्या दिमतीला सुमारे 400 अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने आपल्या मागण्या मांडण्यासाठी विविध संघटना मोर्चे, दिंडी, धरणे, निदर्शने आणि आत्मदहनासाठी परवानगी मागत आहेत. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत गुरुवारी रात्रीपर्यंत 17 मोर्चे, मराठा क्रांती मोर्चाची पैठणमधून पायी दिंडी, 5 संघटनांचे धरणे, तीन संघटनांची निदर्शने, तर 15 जणांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याचे पत्र देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार