तालुकास्तरीय सामुहिक नृत्य स्पर्धा व बहारदार कवी संमेलन

 तालुकास्तरीय सामुहिक नृत्य स्पर्धा व बहारदार कवी संमेलन


मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष व कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतीदिनाचे औचित्य


परळी / प्रतिनिधी


मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष व झुंजार स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार, कॉग्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती दिनानिमित्त

बहारदार अश्या कविसंमेलनाचे आयोजन शनिवार दि 16 रोजी करण्यात आले असून या कवी संमेलनाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे.


झुंजार स्वातंत्र्य सेनानी बीड जिल्ह्याचे माजी खासदार, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक,मानवतावादाचे पुरस्कर्ते कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांचा स्मृतीदिन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाची रेलचेल कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठिन व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा याच्या वतीने सुरू असून शनिवार दि 16 रोजी सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यासाठी तालुका स्तरीय सामूहिक नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे तर संध्याकाळी शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, तरूणाईच्या काळजाच्या वेदना मांडणारे बहारदार असे निमंत्रित कविची मैफिल रंगणार आहे. या निमंत्रित कवी संमेलन प्रसंगी कवी. अरुण पवार, कवी. मुकुंद राजपंखे, कवी. अनंत राऊत, कवी. आबेद शेख,कवी. सुहासिनी देशमुख, कवी. राजेसाहेब कदम आदी मान्यवरांच्या रचना रसिक प्रेक्षकांना ऐकवयास मिळणार आहे.


निमंत्रित कवी संमेलन आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई या ठिकाणी सायंकाळी 7:30 वाजता संपन्न होणार आहे.या निमंत्रित कवी संमेलनाचा रसिक श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावा असे आवाहन कॉ.गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार