परळी क्रीडा शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर

 परळी क्रीडा शिक्षक संघटनेची कार्यकारणी जाहीर 


परळी / प्रतिनिधी 

        परळी येथील पोद्दार लर्न स्कूल येथे शहर व ग्रामीण भागातील सर्व क्रीडा शिक्षक यांची शुक्रवारी (ता.८) बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय जोशी यांनी नूतन कार्यकारणी करण्यात यावी हा प्रस्ताव मांडला. त्यानुसार क्रीडा शिक्षकांमधुन इच्छुकांची नावे मागितली. त्यात सर्वानुमते ग्रामीण भागासाठी म्हणून भगवान बाबा विद्यालय नंदागौळ शाळेचे क्रीडा शिक्षक एस पी मुंडे यांचे तर शहराध्यक्ष म्हणून महर्षी कणाद विद्यालय परळी येथील क्रीडा शिक्षक  विलास अरगडे यांचे नाव घेण्यात येऊन अनुक्रमे यांची निवड करण्यात आली.

      ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम तसेच पोद्दार स्कूल चे संचालक धीरज बाहेती जेष्ठ विस्तार अधिकारी कराड, परळी तालुका क्रीडा स्पर्धा समन्वयक देशमुख पापा, मावळते अध्यक्ष अजय जोशी, प्रा अतुल दुबे, यांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष एस पी मुंडे व शहराध्यक्ष विलास अरगडे यांचा सत्कार केला 

        याप्रसंगी परळी शहरासाठी क्रीडा संकुलन असण्याची आवश्यकता असून त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष एस पी मुंडे यांनी दिले.

बैठकिसाठी क्रीडा शिक्षक श्री बालासाहेब  हंगरगे, विजय मुंडे, जगदीश कावरे, चंदू चाटे, नारायण वानखेडे, शेख अब्बुल, शेख अकेब, श्रीधर जाधव, गडदे आर, केशव गिते, कांबळे व्ही जी, फुलारी ए जी, गुट्टे जी डी, तारे एस ए, मुंडे ए ए, मारोती कांबळे, होळबे वाय यू, लव्हारे ए बी, गित्ते ए जी इत्यादी क्रीडा शिक्षक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार