वैद्यनाथ महाविद्यालयात झाली सॉफ्टवेअर टेस्टिंग कार्यशाळा

 वैद्यनाथ  महाविद्यालयात झाली सॉफ्टवेअर टेस्टिंग कार्यशाळा




परळी प्रतिनिधी....वैद्यनाथ  महाविद्यालयात बीसीए व  बीएस्सी च्या विद्यांर्थ्याना सॉफ्टवेअर टेस्टिंग  व त्यातील नोकरीच्या संधी या विषयावरती एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन  संगणक शास्त्र विभाग मार्फत करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शक म्हणून  कोड राईज टेक सर्व्हिसेस पुणेचे  संचालक, श्री  विकास महाजन व  त्यांच्यासोबत असणारे अभिजित कुलकर्णी यांनी सॉफ्टवेअर टेस्टिंग  व त्यातील नोकरीच्या संधी याची सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना दिले.  आजच्या काळात  संगणकाचे ज्ञान घेऊन सहज नोकरी कशी मिळवता येईल याची सविस्तर माहिती यांनी दिली . या कार्यशाळेचे उद्गाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर . डी . राठोड यांच्या हस्ते करण्यात आले . या  प्रसंगी संगणकाचे आजच्या काळातील योगदान व  नोकरीच्या संधी यावर त्यांनी मार्गदर्शन केले . त्याचबरोबर आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याकारणास्तव संगणकचा वापर प्रत्येक क्षेत्रात आज विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यामुळे ती एक काळाची गरज बनली आहे असेही मत याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ व्ही . व्ही मुंडे कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्रा.गया नागाराव,   वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ टी  ए गित्ते, गणित विभागाचे प्रमुख  डॉ बी एस सातपुते , प्रा अजय मुंडे ,प्रा मनोज वाघमारे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार