भरभरून प्रतिसाद

 कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत स्पर्धकांचा भरभरून  प्रतिसाद



 

परळी / प्रतिनिधी


कॉ.गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान  व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने  *मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष* व *कॉ.गंगाधरआप्पा बुरांडे* स्मृतीदिनानिमित्त सांडेश्वर विद्यालय चनई येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

             

या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून  युवा व्याख्याते अविनाश  भारती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक धुळे सर, मुरलीभाऊ नागरगोजे  हे उपस्थित होते तर दुसऱ्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. डिगोळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जगप्रसिद्ध पकवाज वादक उद्धव बापू आपेगावकर व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय शेटे सर उपस्थित होते या वक्तृत्व स्पर्धेतील उद्घाटन पर भाषणात वक्तृत्व ही लोकांच्या मेंदूवर राज्य करण्याची कला आहे आणि या वक्तृत्व कलेतूनच उद्याचा सुजाण नागरिक घडू शकतो असा संदेश विद्यार्थ्यांना दिला तर अध्यक्षीय  समारोपातून ऍड, अजय बुरांडे यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू आणि सर्व सहभागी स्पर्धक पालक शिक्षक व परीक्षक व या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान व महाराष्ट्र शिक्षण संस्था यांच्या वतीने मानले

           

या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्राथमिक माध्यमिक व खुल्या गटामध्ये विविध जिल्ह्यातील एकूण एकशे नव्वद स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या सहभागी स्पर्धकासोबत मोठ्या प्रमाणावर पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक हे उपस्थित होते या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे आहेत


     *प्राथमिक गट विजेते* 


01 शिंदे स्वरा राहुल  प्रथम

स्वामी विवेकानंद विद्यालय अंबाजोगाई


02 सारडा अर्णव दत्तप्रसाद द्वितीय  आदर्श प्राथमिक विद्यालय घाटनांदुर


03 आवाड भार्गवी शेषराव तृतीय   गोदावरी कुंकू लोळ विद्यालय अंबाजोगाई


04 विटेकर अभिनव मारुती उत्तेजनार्थ

सिंदफणा पब्लिक स्कूल माजलगाव


          *माध्यमिक गट विजेते* 


01 मदने राजनंदिनी प्रकाश  प्रथम आसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांडेखेल 



02 मोदी श्रावणी सुरेश द्वितीय श्री शंकर विद्यालय घाटनांदुर


03 कदम स्नेहल सुभाष  तृतीय पोद्दार लर्न स्कूल परळी


04 मुंदडा समृध्दी हरीश उत्तेजनार्थ राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर


            *खुला गट* 


01  साबळे वैष्णवी दत्तात्रय  प्रथम (पंडित गुरु विद्यालय सिरसाळा), 02 बेले यशश्री हनुमंत  द्वितीय  (जय भवानी विद्यालय लोखंडी सावरगाव),03 पवार श्रीराम दत्तू  तृतीय  (मानव लोक समाजकार्य महाविद्यालय), 04 गिरी प्रथमेश बळीराम उत्तेजनार्थ (एम पी लॉ कॉलेज औरंगाबाद) स्पर्धेतील सर्व विजेत्यांना कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान व महाराष्ट्र शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले  या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रास्ताविक आसूबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री बुरांडे सर सूत्रसंचालन जरा देशमुख सर  तर आभार विभुते सर यांनी मानले तर समारोपाचे प्रास्ताविक सौ भक्त मॅडम तर आभार प्रशांत मस्के सर यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !