मराठा क्रांती मोर्चाच्या आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सातव्य दिवशीही सुरु

 मराठा क्रांती मोर्चाच्या आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सातव्य दिवशीही सुरु  



परळी,( प्रतिनिधी):- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे, आंदोलने, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज 2 सप्टेंबर 2023 पासून ठिय्या आंदोलनास बसला आहे. तर काल 6 सप्टेंबर आमरण उपोषणास व्यंकटेश बाबुराव शिंदे व शरद आबासाहेब चव्हाण हे बसले आहेत या आंदोलनास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. दि 8 सप्टेंबर 2023 रोजी सातव्या दिवशी विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. दिवसेंदिवस परळी येथील आंदोलनाची धार मोठ्या प्रमाणात वाढत असून विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.


आंदोलनाच्या सातव्या दिवशी परभणी जिल्ह्याचे शेतकरी नेते शिवाजीराव कदम, सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे संचालक भागवत बाप्पा सोळंके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर ,भाजप नेते सुधाकर पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष भागवत गीते, बाबा शिंदे, आरपीआयचे नेते सचिन कागदे ,शिवसेनेचे नेते राजाभय्या पांडे, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण दादा गव्हाणे, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विक्रम मिसाळ, बबन कसबे, संतोष गरड, अजय काकडे, बोरखेड चे सरपंच ज्ञानेश्वर वानखेडे, दादा हरी वडगाव चे मा सरपंच भास्कर शिंदे, सचिन सातभाई ,शामराव सोळंके ,बालासाहेब सौंदडे ,मोहन भाऊ सोळंके, ज्ञानेश्वर मोरे ,राहुल सोळंके, बालाजी मोरे ,विवेक राडकर, अरबाज पठाण ,सय्यद फिरोज, फैयाज शेख, बळीराम सूर्यवंशी, मुंजाजी शिंदे, गोविंद देशमुख, श्रीनिवास सूर्यवंशी ,गजानन लांडगे ,शिवाजी देशमुख ,सतीश काळे ,आदींनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आपला पाठिंबा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार