परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन नुतन कार्यकारिणी जाहीर

 परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन  नुतन कार्यकारिणी जाहीर


सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती

विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा नुतन कार्यकारिणीचा निर्धार



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.29 - विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहून सामाजिक जाणीव जागृत ठेवणारे संघटन म्हणून परिचित असलेल्या परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.यामध्ये सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली.विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

            

बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन च्या माध्यमातून विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन चे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिलेले आहे.सामाजिक चळवळीत अग्रेसर परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन ची नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे माजी जिल्हाध्यक्ष पंकज तापडिया, माजी जिल्हा सचिव तपन मोदाणी,परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन चे संस्थापक अध्यक्ष सचिन सारडा माजी तालुकाध्यक्ष आशिष काबरा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


यामध्ये सूरज कोठारी अध्यक्ष, डॉ.शुभम लाहोटी,अक्षय रांदड,गणेश सोनी,राहुल भंडारी उपाध्यक्ष ,सुमीत नावंदर सचिव,कपिल मुंदडा सह सचिव, मोनिष मुंदडा कोषाध्यक्ष,अनिल राठी सह कोषाध्यक्ष, गोविंद पोरवाल संगठन मंत्री,डॉ दर्शन काबरा आरोग्य मंत्री,सुरज बियाणी सांस्कृतिक मंत्री, श्री तोतला प्रसिद्धि प्रमुख,अनुप सारडा बधाई संदेश मंत्री,अमित रांदड क्रीडा मंत्री,शरद मानधनी शैक्षणिक कौशल्य विकास मंत्री ऍड संज्योत लाहोटी व्यवसाय मंत्री या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सर्वांनुमते करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !