वैद्यनाथ कॉलेजमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर उद्या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर उद्या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन


परळी प्रतिनिधी-- जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये आजादी का अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले त्या बलिदानाच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी इतिहास, समाजशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन उद्या दि.16/09 /2023 रोजी करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटक जवहार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री सदाशिव आप्पा मुंडे यांच्या हस्ते होत आहे तर प्रमुख व्याख्याते व बीजभाषक इतिहास विभाग प्रमुख व संशोधक मार्गदर्शक डॉ.सतीश कदम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नवीन पैलू या विषयावर व्याख्यान होणार आहे व दुसऱ्या सत्रात डॉ.नलिनी वाघमारे , इतिहास विभाग,टिळक विद्यापीठ पुणे यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामात बिदरचे योगदान या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दुपारच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी जवहार शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री दत्ताप्पा इटके  गुरुजी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. अरुण दळवे वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर, प्राचार्य डॉ मुकुंद देवर्षी, खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई, इतिहास विभाग प्रमुख,प्रोफेसर डॉ.विनोद जगतकर कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी यांच्या विचारमंथनातून हैदराबाद मुक्तिसंग्राम संदर्भातील विविध पैलू वर प्रकाश टाकला जाणार आहे. आजादी का अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयाच्या अनुषंगाने संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या विचारातून संशोधनात्मक  पेपर पुस्तिका प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते प्रकाशित केली जाणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी राठोड, उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे, सेमिनारचे समन्वयक प्राणीशास्त्र विभागातील डॉ.विनोद गायकवाड व इतिहास विभाग प्रमुख डॉ बी के शेप तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्त्तर कर्मचारी  परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार