शेतात लागवड केलेला लाखोंचा गांजा जप्त

 शेतात लागवड केलेला लाखोंचा गांजा जप्त






बीड - सहा. पोलीस अधिक्षक, पंकज कुमावत यांच्या पथकाने पोलीस ठाणे चकलंबा हाद्दीमध्ये घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे NDPS अंतर्गत गांजावर मोठी कारवाई करत लाखोंचा गांजा जप्त करुन एका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, दिनांक 12.09.2023 रोजी सहा. पोलीस अधिक्षक केज, पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे संभाजी कराड याने त्याचे स्वतःचे मालकीचे शेतामध्ये बेकायदेशिर रित्या गांज्याची लागवड केली आहे. त्या अन्वये सहा. पोलीस अधिक्षक यांनी सदर बातमीची माहिती नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड यांना देवुन पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक पंकज कुमावत सोबत, निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गेवराई, प्रो. पोलीस उपअधिक्षक, श्रीमती खाडे, सपोनि एकशिंज, पोउपनि इंगळे, पोउपनिपोउपनि तांगळे,, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांचे टिमने घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर शेतामध्ये छापा मारला असता एकुण 554 कि. ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 27,27,700/- ( सत्ताविस लाख सत्ताविस हजार सातशे ) लागवड केलेला मिळुन आला. यातील आरोपी संभाजी हरीभाऊ कराड, (वय 37), रा. घोगसपारगाव - ता.शिरुर याचे विरुद्ध पोउपनि राजेश पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !