सद्यस्थितीत शिक्षकांना आत्मपरीक्षणाची गरज ---"वैद्यनाथ" मध्ये आदर्श शिक्षक हुलगुंडे यांचे विचार

 सद्यस्थितीत शिक्षकांना आत्मपरीक्षणाची गरज ---"वैद्यनाथ" मध्ये आदर्श शिक्षक  हुलगुंडे यांचे विचार 




                  

परळी वैजनाथ दि.५ -

                        गुरु- शिष्यांच्या आदर्श परंपरेमुळे अगदी प्राचीन काळापासून भारताचा नावलौकिक सर्वोच्च स्थानी राहिला आहे. पण अलीकडे काळात शैक्षणिक पावित्र्य लोप पावत चालल्याने आदर्शांची ती महान परंपरा खंडित होत आहे . त्यासाठी सद्यस्थितीत शिक्षकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मणराव हुलगुंडे-गुरुजी यांनी व्यक्त केले.

                  येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी "शिक्षक दिन" साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री हुलगुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या नॅक समितीचे समन्वयक  प्रा.डॉ. बी.के. केंद्रे होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका प्रा. मंगला पेकमवार, प्रा. डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा.डा.बी.एस.सातपुते, प्रा.डा. एम.जी. लांडगे, प्रा . डॉ.बी.पी. गजभारे आदी उपस्थित होते.

               आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री हुलगुंडे यांनी मानवी जीवनात शिक्षकाचे महत्त्व विशद करून त्यांनी शिक्षक हाच खऱ्या अर्थाने समाज व राष्ट्राचा शिल्पकार असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. शिक्षकांनी आपल्या जीवनात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान जपले की त्यांचा विद्यार्थ्यावर आपोआप प्रभाव पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडण्यासोबतच सदाचारपूर्ण समाजाची स्थापना होऊ शकते, असे ते म्हणाले. तर अध्यक्ष समारोपात डॉ. बी.व्ही. केंद्रे यांनी विद्यार्थ्यांच्या मनरूपी आरशात शिक्षकांच्या प्रतिमांचे प्रतिबिंब आपोआप पडत असल्याने आपली वागणूक सर्वदृष्टीने  उत्तमोत्तम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

          यावेळी रसायनशास्त्र विभाग व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे अनावरण व भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेवर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेतील कु. तेजस्विनी साबळे (प्रथम),कु. प्रेरणा वानरे (द्वितीय) कु.अश्विनी चाटे (तृतीय) या विद्यार्थिनींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित प्राध्यापकांचा सत्कार केला. या कार्यक्रमास प्रा. डॉ. व्ही. व्ही. आर्य प्रा. डॉ. किरवले,प्रा. कॅप्टन जी. एस. चव्हाण, प्रा. शेटे , प्रा. बिडगर, प्रा.डा. प्रेरणा दीक्षित, प्रा.डा. गुट्टे, प्रा. गारोळे, प्रा. कलमे आदी उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अर्चना चव्हाण यांनी केले, तर शिक्षक दिनाची भूमिका प्रा.डा. नयनकुमार आचार्य यांनी मांडली. सूत्रसंचालन कु. पूजा नेमाने हिने केले तर आभार कु. दिव्या गवळी हिने मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार