मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

 जालन्यातून आणखी एक एल्गार:ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निवेदने देणार 


मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

जालना । शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर पासून राज्य भर निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी.उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले, परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या मागण्या बदल बोलले नाही. या मागण्यांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने सम स्त ब्राह्मण समाज समितीच्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात सरकारला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागोचा नारा दिला आहे.


दरम्यान त्याचाच भाग म्हणूण दिनांक १७ सप्टेंबर पासुन समस्त ब्राह्मण समजाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाचा आवाज शासना पर्यंत पोहचण्यासाठी राज्यभर, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. ही माहिती मुख्य समन्वयक महाराष्ट्र दीपक रणनवरे व धनंजय कुलकर्णी, विजया कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, महेश अकोलकर, शाम कुलकर्णी, श्रीकांत जोशी, योगेश जानतीकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !