मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव:'आयुष्यमान भव' योजनेचा लाभ घ्यावा

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव:'आयुष्यमान भव' योजनेचा लाभ घ्यावा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

सन 2023 हे मराठवाडा मुक्तीसंग्रामचे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त दि. 17 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीन भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचेमार्फत "आयुष्यमान भव" ही योजना चालू  असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
       "आयुष्यमान भव" योजनेचे दि. 13 सप्टेंबर राष्ट्रीय पातळीवर  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर राज्यपाल रमेश बैस व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते  ऑनलाईन उद्‌घाटन झालेले आहे. "आयुष्यमान भव योजनेअंतर्गत खालील बाबींचा सामावेश आहे. 1) आयुष्यमान आपल्या दारी यामध्ये आजारपणासाठी रु.5 लाखापर्यंतच्या मोफत उपचार असून त्यासाठी आयुष्यमान भारत "गोल्डन कार्ड" व "आभा कार्ड काढण्यात येणार आहे. सन 2011 च्या SECC च्या यादीतील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटरशी संपर्क साधून वरील कार्ड काढून घ्यावेत.
    आयुष्यमान भव या अंतर्गत दर शनिवारी आरोग्य तपासणी, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी नजीकच्या दवाखान्याशी संपर्क साधावा.यामध्ये ● पाहिल शनिवार- असंसर्गजन्य आजार तपासणी (BP शुगर, कॅन्सर) 2) दुसरा शनिवार - संसर्गजन्य (साथीचे आजार तपासणी)

हिवताप, डेंगु, समरोग कुष्ठरोग 3 तिसरा शनिवार-माता-बाल आरोग्य व नेत्र तपासणी 6) चौथा शनिवार - अंगणवाडीतील व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
3) आयुष्यमान सभा- गावनिहाय, सभा, बैठका, मेळावे, ग्रामसभा, घेवून आमुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड व आरोग्याच्या विविध योजनेबाबत माहिती देणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !