नांदुर शिंगोटयात शिव-शक्ती परिक्रमेचं जल्लोषात स्वागत

 शिव-शक्ती परिक्रमा देव दर्शना बरोबरच जनतेच्या सात्विक दर्शनासाठी - पंकजा मुंडे


लोकनेते मुंडे स्मारकास अभिवादन ; बौध्दविहारात केली बुध्दवंदना


नांदुर शिंगोटयात शिव-शक्ती परिक्रमेचं जल्लोषात स्वागत

नांदुर शिंगोटे (नाशिक) ।दि. ०५।

शिव-शक्ती परिक्रमा प्रवासादरम्यान ठिकठिकाणी जनतेचं एवढं प्रेम मिळत आहे की, कांही जण याला  शक्तिप्रदर्शन म्हणत आहेत. परंतु आमची ही शक्ती आहे ती आहेच,त्याचं प्रदर्शन मांडायची गरज नाही. हे शक्ती प्रदर्शन नाही तर  जनतेच्या प्रेमाचं सात्विक दर्शन आहे अशा शब्दांत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.


   नांदूर शिंगोटे येथे शिव-शक्ती परिक्रमेचं वाजत-गाजत, मिरवणूक काढून मोठया जल्लोषात ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्यानंतर  ग्यामस्थांशी संवाद साधताना पंकजाताई बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शिवशक्ती परिक्रमा घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू झाली. यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात मुंडे साहेब असताना त्यांचे दर्शन घेऊन व त्यांच्या पश्चात परळीत गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन आपण करतो. शिवशक्ती परिक्रमेची सुरुवात यावेळी परळीतून होऊ शकली नाही हे मनात कुठेतरी चुकचुकल्या सारखे वाटत होते परंतु आज नांदूर शिंगोटे येथे येऊन गोपीनाथ गडाचे दर्शन झाल्याने ती भावना पूर्ण झाली. जनतेचे सदैव प्रेम व आशीर्वाद हे कोणालाही प्राप्त होत नाहीत मात्र मुंडे साहेबांच्या वारशात मला हे मिळाले हे माझं भाग्यच आहे. ज्याप्रमाणे मुंडे साहेबांना फार काही मिळावं असे लोकांचे आशीर्वाद असायचे तीच भावना आपल्याबद्दल जनतेच्या मनात आहे. यापेक्षा जीवनात दुसरं आपल्याला काहीही नको. हे प्रेम हे आशीर्वाद सदैव मिळावे हीच अपेक्षा आहे. शिवशक्ती परिक्रमा सुरू झाल्यापासून जनतेचे प्रचंड प्रेम आपल्याला मिळत आहे. आज आपण कोणत्याही पदावर नाही, कोणाला लाभ मिळवून देऊ शकू असे कोणतेही पद नाही तरीही जनतेची ही निरपेक्ष प्रेम व आशीर्वादाची भावना आपल्याला संघर्ष करण्याची शक्ती देते. या शक्तीचे दर्शन घेण्यासाठीच ही परिक्रमा आपण करत आहोत. शिवशक्ती परिक्रमा कोणाबद्दलची कटूता, द्वेष यासाठी नाही किंवा कोणाला काही  दाखवण्यासाठी किंवा कोणाची जिरवण्यासाठी नाही. तर ही शिव आणि शक्तीचे त्याचबरोबर तुमचे दर्शन घेण्यासाठीची सात्विक परिक्रमा आहे.  ईश्वराची साधना आणि गरीबांची सेवा आपल्या हातून सतत घडावी हिच इच्छा आहे. 


लोकनेते मुंडे स्मारकास भेट व अभिवादन

----------

पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधण्यापूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. माजी आमदार राजेभाऊ वाजे, उदय सांगळे, प्रवीण घुगे, राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते. पंकजाताईंनी बौध्दविहारात जाऊन बुध्दवंदनाही केली तसेच भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !