परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची लाभणार उपस्थिती

वीरशैव समाज परळीच्या वतीने 19 सप्टेंबर पासून श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन

श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची लाभणार उपस्थिती


परळी/प्रतिनिधी


वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी यांचा 122 वा पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास 19 सप्टेंबरपासून उत्सवाला सुरूवात होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार असून श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत.


 श्री संतश्रेष्ठ गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात होणार आहे. सप्ताहात अखंड शिवनाम, श्री गुरूलिंग स्वामींचा पालखी महोत्सव, कीर्तन, प्रवचन आदी धार्मीक कार्यक्रम श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

सोमवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मंदिरात आरती व महाप्रसाद होईल त्याच दिवशी रात्री ठीक आठ वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघेल, रात्री 9वाजता पालखी वैद्यनाथ मंदिरात थांबणार असून दुसऱ्या दिवशी 26 सप्टेंबर मंगळवार रोजी श्रींची पालखी सकाळी  7 वाजता श्री वैद्यनाथ मंदिरातून निघून श्री वक्रेश्वर मंदिर समोर थांबेन तेथून सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक परळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघणार असून पालखीसोबत व पारायणासाठी समाजातील प्रत्येक घरातून किमान एका व्यक्तीने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी 5वाजता या पालखी मिरवणुकीचे विसर्जन श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मंदिरात होणार असून तदनंतर आरती व महाप्रसाद होणार आहे. दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज सकाळी 7  ते 8  शिव सहस्त्रनामावली, सकाळी 9 ते 11 परमरहस्य व श्री पलसिद्ध महात्म्य पारायण श्री गुरु ष.ब्र108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेड्रेकर सकाळी 11 ते 12 पर्यंत श्री मन्मथ स्वामी गाथावरील भजन दुपारी 3 ते 5 व शिव पाठ आरती सायंकाळी  5.30 ते 6.30 वाजेपर्यंत होणार आहे श्री गुरु 108 वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडेकर यांचे प्रवचन व रात्री  8 ते 10 किर्तन होणार असून तदनंतर जागर कार्यक्रम होणार आहे परम रहस्याचे पारायण प्रमुख शि.भ.प. व्यंकट मारुतीआप्पा होनशेटे हे करणार आहे.

या कार्यक्रमास वीरशैव समाजातील सर्व महिला पुरुष व सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गुरुलिंग स्वामी देवस्थान चे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी,सचिव अ‍ॅड.गिरीषअप्पा चौधरी, सदस्य प्रा.रामलिंगप्पा काटकर, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमारअप्पा व्यवहारे, शंकरअप्पा उदरगीरकर, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अ‍ॅड.मंदार नरवणे सौ मीरा धनंजय कोरे व समस्त वीरशैव समाज परळी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!