धनंजय मुंडेंनी केला शोक व्यक्त

 डॉ.स्वामिनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली - धनंजय मुंडे


कृषी शात्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल धनंजय मुंडेंनी केला शोक व्यक्त


मुंबई (दि. 28) - सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड मोठी हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ट्विट करून धनंजय मुंडे यांनी डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


डॉ. स्वामिनाथन यांचे आज निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय 98 वर्ष होते. कृषी क्षेत्रात क्रांती घडवत डॉ. स्वामिनाथन यांनी गहू, तांदूळ आदी धान्याच्या अधिकाधिक उत्पन्न देणारे वाण विकसित केले. त्यांच्या योगदानामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कायमचे संपले. 


स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन तसेच विविध प्रशासकीय पदे भूषवत डॉ. स्वामिनाथन यांनी कृषी क्षेत्रात अमूलाग्र संशोधन केले. डॉ.स्वामिनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार