नाथ शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने सहृदय सत्कार_

 नाथ व रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्था हे माझे कुटुंब - प्रदिप खाडे



 नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचा नाथ शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने सहृदय सत्कार                                          

    परळी वै. (प्रतिनिधि):                 


दि.५ सप्टेंबर २०२३                     


नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीप शिवाजीराव खाडे यांच्या वाढदिवसा निमित्त 'नाथ मित्र परिवारातर्फे' सहृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.


कै.रामभाऊ (अण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना आरोग्यासह दीर्घायुष्य लाभावे यासाठी मंगळवार दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी मित्र परिवाराच्या वतिने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम  राबविण्यात आले.          प्रदिप खाडे हे स्वभावाने स्वच्छ,निर्मळ, अत्यंत मनमिळाऊ, दिलखुलास,शेती, शिक्षणा बरोबरच सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन चालनारे व प्रत्येकाला आपलेसे वाटणारे अलौकिक व्यक्तिमत्व आहेत असे गौरवोद्गार आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य श्री.अतुल दुबेसर यांनी काढले. 


शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व म्हणजे प्रदिपजी खाडे साहेब त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी वैद्यनाथास मित्रमंडळीच्या वतीने अभिषेक करण्यात आले. तसेच प्रा. शंकर कापसे यांनी आपल्या मनोगतात प्रदिप खाडे यांचे व्यक्तिमत्त्व कसे भाऊक आहे हे काही अविस्मरणीय अनुभव व्यक्त करत विषद केले.  त्याचबरोबर मिलिंद ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक रोडे सर, मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे कांबळे सर, शारदा विद्यामंदिर येथील मुख्याध्यापिका श्रीमती धस मॅडम, कोम्मावार मॅडम, सुरेश (नाना) फड,यश इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य इत्यादी मान्यवरांनी या शुभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत श्री.प्रदीप खाडे सरांना अभिष्ट चिंतीले. नाथ मित्र परिवारातर्फे केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. 


 मिलिंद माध्यमिक व ज्युनियर कॉलेज,यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, शारदा विद्यामंदिर, शारदाबाई मेनकुदळे विद्यालय संगम, यश इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने सर्वे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने याच्या हस्ते फेटा बांधून, पुष्पहार, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माजी मुख्याध्यापक श्री.कोम्मावार सर, गरड सर यांनीही खाडे साहेबांचा वैयक्तिक सत्कार केला.


या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीप खाडे, उद्योजक सुरेश (नाना) फड,यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक श्री.अतुल दुबेसर , प्राथमिक विभागाचे समन्वयक श्री.ओझा सर, मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर,संचालक विलास खाडे सर उपस्थित होते. 


सत्काराला उत्तर देताना नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीप शिवाजीराव खाडे भाऊक होत म्हणाले ," नाथ परीवार हे माझे कुटुंब आहे. आपण सर्वांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा ह्या माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे."


 मागील दोन-तीन वर्षांपासून माझ्यावर नामदार धनंजयजी मुंडे साहेबांनी सहसचिव म्हणून टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. येणाऱ्या काळात कृषीमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर हे एज्युकेशनल हब झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी बोलताना प्रदिप खाडे यांनी व्यक्त केला. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक साखरे सर व प्राचार्य दुबेसर यांचा सत्कार स्वतः खाडे सरांनी केला.                            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुल दुबे सर,अंबादास आघाव सर, प्रा. किरण शिंदे सर, प्रा.शंकर कापसे सर,एकनाथ फड सर यांच्या सह सर्व प्राचार्य /मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी परीश्रम घेतले.

संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळेसर व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक साखरे सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !