पंकजा मुंडे यांची अशीही संवेदनशीलता !

 पंकजा मुंडे यांची अशीही संवेदनशीलता !








धाराशीव ।दिनांक ०८।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. धाराशीव जिल्हयातील मराठा समाजाच्या तरूणाने आरक्षणावरून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे त्यांनी आज शिव-शक्ती परिक्रमे दरम्यान कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ, हार-तुरे न घेता फक्त हात जोडून स्वागत स्विकारले.


   पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा आज श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दर्शन घेऊन धाराशीव जिल्हयात आली. जिल्हयाच्या सीमेवर बोळेगाव, आलूर, मुरूम, नळदुर्ग, जळकोट येथे पंकजाताई मुंडे यांचे भव्य स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते पुष्पगुच्छ, हार-तुरे घेऊन रस्त्यावर जमले होते पण पंकजाताईंनी असे स्वागत स्विकारण्यास साफ नकार दिला. मराठा समाजातील तरूणाने आरक्षणाच्या प्रश्नावरून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, अशा परिस्थितीत असं स्वागत घेणं माझ्या मनाला प्रशस्त वाटत नाही असे सांगून केवळ हात जोडून जनता जनार्नदाला अभिवादन केले. पंकजाताईंच्या या संवेदनशील मनाचा कार्यकर्त्यांना असा पुन्हा एकदा प्रत्यय आला.


*अणदूरमध्ये कार्यकर्त्यांनी काढली भर पावसात मिरवणूक*

----------

पंकजाताई मुंडे अणदूर येथे पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला. अशा पावसातही स्वागतासाठी जमलेल्या ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी खंडोबा मंदिरापर्यंत त्यांची मिरवणूक काढली. मंदिरात येऊन त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 'ज्ञानेश्वरी' भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजपचे नेते प्रवीण घुगे, अर्चनाताई पाटील, दिपक आलुरे, दत्ता कुलकर्णी आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार