परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

सामूहिक 'संस्कृत दिन' समारंभ

 संस्कृत भाषेत विश्वात्मक नवनिर्मितीचे सामर्थ्य!-- प्रा. सोनेराव आचार्य 

 परळी वैजनाथ, दि.६-

                        मानवी मनाच्या विकृतींतून  निर्माण झालेल्या भेदभावनांच्या भिंती तोडून एकसंध समाज उभारण्यासाठी दिव्य अमृतवाणी असलेल्या संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज आहे. कारण याच भाषेत विश्वात्मक नवनिर्मितीचे सामर्थ दडले आहे ,असे प्रतिपादन संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सोनेराव आचार्य यांनी केले.

        येथील आर्य समाज सभागृहात  संस्कृत भाषा प्रसार केंद्राच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या  सामूहिक 'संस्कृत दिन' समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री उग्रसेन राठौर होते. यावेळी वैदिक विचारवंत आचार्य सानंदजी, गुरुकुलाचे प्रमुख आचार्य सत्येंद्रजी,संयोजक पं. प्रशांतकुमार शास्त्री, संस्थेचे अध्यक्ष जुगल किशोरजी लोहिया, पुरस्कारप्रदाते संज्योत जयपाल लाहोटी आदी उपस्थित होते.

              आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री आचार्य यांनी संस्कृत भाषेच्या गुणवैशिष्ट्यांवर ओघवत्या शैलीतून प्रकाश टाकला. ते म्हणाले - 'मानव जीवन सर्वांगसुंदर, आनंदी, निरामय व ज्ञानयुक्त बनवायचे असेल तर संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. ही भाषा अवगत झाल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. आपल्या डोक्यावर बसलेले पाश्चात्य संस्कृती व आग्लभाषेचे भूत दूर सारून शुद्ध, सोप्या, कर्णमधुर व सुरम्य असलेल्या या भाषेचे ज्ञानग्रहण केले पाहिजे.'

 यावेळी आचार्य श्री सानंदजी यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले. सुरुवातीला वैदिक मंत्रोद्घोषात विद्वानांनी दीप प्रज्वलन करून या संस्कृत दिन समारंभाचे उद्घाटन केले. तर विद्यार्थ्यांनी संस्कृतगीतिका सादर केल्या. संस्कृत दिनानिमित्त घेण्यात आलेल्या श्लोक पाठांतर व भाषण स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्लोकपाठान्तर स्पर्धेत विविध शाळा -महाविद्यालयांच्या एकूण २२७ तर संस्कृत भाषण स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या संस्कृतस्पर्धांच्या  परीक्षकांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.           ‌.                        

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ .नयनकुमार आचार्य यांनी, सूत्रसंचालन प्रा .डॉ. अरुण चव्हाण व  सौ. पल्लवी फुलारी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. वीरेंद्र शास्त्री यांनी मानले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सर्वश्री रंगनाथ तिवार, लक्ष्मण आर्य गुरुजी, उदय तिवार ,दयानंद शास्त्री, ओम कुमार कुरुडे, सोमेंद्र शास्त्री,अरविंद घोडके आदींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!