गणेश मंडळ कार्यकारणी

 श्री गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुरवसे उपाध्यक्ष उमंजय जाधव तर सचिवपदी दादा जाधव यांची निवड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


       येथील फुले चौक देशमुख गल्ली विभागातील युवक कार्यकर्त्यांची व श्री गणेश मंडळाचे विविध मार्गदर्शक तसेच पदाधिकारी यांची एक व्यापक बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये फुले चौक देशमुख गल्ली येथील श्री गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुरवसे, उपाध्यक्षपदी उमंजय जाधव, तर सचिवपदी दादा जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


    याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांस्कृतिक तथा विधायक कार्यक्रमांनी साजरा होणाऱ्या फुले चौक येथील श्री गणेश मंडळाचे हे 50 वे पुष्प आहे. फुले चौक देशमुख गल्ली विभागातील श्री गणेश मंडळाची गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात गणेश मंडळाचे मार्गदर्शक तुकाराम वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक बैठक नुकतीच संपन्न झाली. गल्लीतील प्रतिष्ठित नागरिकांसह विविध मान्यवर तथा गणेश मंडळाचे युवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या नियोजन बैठकीमध्ये श्री गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुरवसे, उपाध्यक्षपदी उमंजय जाधव, तर सचिवपदी दादा जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उर्वरित कार्यकारिणीमध्ये

कोषाध्यक्ष बळीराम साखरे, सहसचिव अभिलाष साखरे, सहकोषाध्यक्ष विकास कदम,

व्यवस्थापक अशोक सरवदे, राहुल सुरवसे, दत्ता सुरवसे, राजेश सुरवसे आदी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


    याप्रसंगी श्री गणेश मंडळाचे सदस्य सुरेश साखरे, तुकाराम वाकडे, महादेव जाधव, नरहरी सुरवसे, दिनेश परळीकर, श्रीराम लांडगे, पांडुरंग जाधव, विनोद देशमुख, दीपक देशमुख, शरद चव्हाण, गणेश क्षिरसागर, गणेश देशमुख, संतोष साखरे, नितीन झिरपे, गणेश नाईकवाडे, महेश खरोळकर, रवी जाधव, एकनाथ साखरे, सतीश गावडे, महादेव पानखडे, मनोज गीते, गजानन पानखडे, योगेश पानखडे, राजेश सुरवसे, राहुल सुरवसे, पवन सुरवसे, हरीश साखरे, ओमकार जाधव, महेश साखरे, ऋषी कदम, सिद्धेश्वर कदम, अशोक सरवदे, योगेश साखरे, पवन साखरे आदि सदस्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !