नूतन कार्यकरिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

 ' भाशिप्र' संचलित परळीच्या भेल सेकंडरी माध्यमिक शाळेच्या नूतन कार्यकरिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार



...........................

परळी  ( एम बी न्यूज वृत्तसेवा)

परळी शहरातील पहिली सीबीएसई शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वदूर ओळख असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित भेल सेकंडरी माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्था मंडळ, शालेय समिती तसेच अर्थ समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री विष्णुपंत कुलकर्णी व रामभाऊ कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नूतन कार्यकारणीतील अध्यक्ष, कार्यवाह व इतर सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असणारे संस्थेचे जेष्ठ पदाधिकारी संस्थेचे माजी कार्यवाह वसंतराव देशमुख गुरुजी, माजी अध्यक्ष विकासराव डुबे व डॉ सतीश रायते यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

श्री विकासराव डुबे , श्री वसंतराव देशमुख गुरुजी, डॉ. सतिश रायते यांनी वयाची ७५ वर्षे पुर्ण केली असल्याने या सर्वांनी मार्गदर्शकाच्या भुमिकेत रहायचे ठरवले आहे . तसेच श्री विकासराव डुबे यांनी १९८० पासून या शाळेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले  आहे व शाळा नावारुपास आणली आहे. 

स्थानिक व्यवस्था मंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून जुगलकिशोर रामपालजी लोहिया (अध्यक्ष), जीवन गडगुळ (कार्यवाह), शांतीलाल जैन सदस्य, अमोल दुबे सदस्य, विष्णूपंत कुलकर्णी कायम निमंत्रित सदस्य, मुकुंद देशपांडे सदस्य, श्रीराम पोरवाल सदस्य, गिरीश ठाकूर सदस्य, विकासराव डूबे निमंत्रित सदस्य, सूर्यकांत केंद्रे पालक प्रतिनिधी आदींचा यामध्ये समावेश आहे.

शालेय समितीच्या अध्यक्षपदी अमोल डूबे , कार्यवाहपदी गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नयनकुमार आचार्य, शोभा भंडारी, डॉ. सौ अनुजा पाठक, मुख्य अभियंता महाजनको यांची सदस्यपदी तर वसंतराव देशमुख गुरुजी, डॉ सतीश रायते यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीवर सुनील बोतकुलवार शिक्षक प्रतिनिधी व दिनेश राठोड पालक प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहेत.

अर्थ समितीचे अध्यक्ष म्हणून शांतीलाल जैन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यवाह  एम एस राव, ॲड. राजेश्वर देशमुख, तुषार देशमुख, गिरीश देशमुख, रमाकांत टाक, डॉ स्मिता तापडिया (सर्व सदस्य) आदींचा समावेश अर्थ समितीमध्ये करण्यात आला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य विष्णुपंत कुलकर्णी व अंबाजोगाई चे रामभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. परळीच्या भेल सेकंडरी माध्यमिक शाळेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र अलुरकर, कार्यवाह हेमंतजी वैद्य यांच्यासह सर्वच केंद्रीय कार्यकारिणीने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !