वीरशैव समाज परळीच्या वतीने भारतीय वायुदलातील फ्लाईंग ऑफिसर सर्वेश नावंदे याचा ह्रदय सत्कार

 वीरशैव समाज परळीच्या वतीने भारतीय वायुदलातील फ्लाईंग ऑफिसर सर्वेश नावंदे याचा ह्रदय सत्कार 


परळी वैजनाथ /प्रतिनिधी

भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर रुजू झाल्याबद्दल परचुंडी तालुका परळी चा सर्वेश नावंदे याचा वीरशैव समाज परळी ,महाराष्ट्र वीरशैव सभा परळी,महाराष्ट्र विकास प्रतिष्ठान परळी ,शिवा संघटना परळी ,वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर  तपोनुष्ठान समिती परळी यांच्याकडून सर्वेशचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभा बीडचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी तर व्यासपीठावर डॉक्टर सुरेशचंद्र चौधरी ,सुभाष नावंदे माजी नगरसेवक अनिल अष्टेकर, चंद्रकांतआप्पा समशेटे, परळी समाचार चे संपादक आत्मलिंग शेटे, वीरशैव विकास प्रतिष्ठानचे सचिव सुधीर फुलारी सर माजी नगरसेवक चेतन सौंदळे सर, माजी नगरसेवक रमेश चौंडे,वैजनाथराव  बागवले उपस्थित होते .

सर्वेश सुभाष नावंदे याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार शाल,श्रीफळ पुष्पहार महात्मा बसवेश्वर प्रतिमा देऊन करण्यात आला यावेळी डॉक्टर सुरेश चौधरी,मा नगरसेवक अनिल अष्टेकर ,मा नगरसेवक चेतन सौंदळे सर यांनी मनोगत व्यक्त केले . सर्वेशच्या वडील सुभाष नावंदे यांनी पालकांनी मुलांवर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला शिकण्याची मोकळीक देणे आवश्यक आहे,असेच विद्यार्थी पुढे यश संपादन करू शकतात असे सांगितले.

अध्यक्षीय समारोप श्री दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी करताना तरुण युवकांसाठी सर्वेशची निवड ही प्रेरणादायी असल्याचे सांगून त्याचा आदर्श तरुण युवकांनी घ्यावा असे आवाहन करून सर्वेशचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगितले.

 यावेळी सत्कारला उत्तर देताना सर्वेशने अतिशय जिद्दीने या परीक्षांना कसा सामोरे गेलो बर्‍याच वेळाअपयश आले परंतु खचलो नाही डगमगलो नाही ,त्याचबरोबर मला माझ्या आई वडिलांनी खूप मदत केली ,मला समजून घेतले त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो .राष्ट्रीय छात्र सेना  यात सर्व तरुण मुला मुलींनी सहभागी व्हावे यातून पुढे अशा प्रकारच्या बर्‍याच संधी आपणास मिळतात असे सांगितले व प्रभावीपणे विचार व्यक्त करून उपस्थित सर्वांची  मने जिंकली कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक नावंदे सर यांनी सूत्रसंचलन रंगनाथ खके गुरुजी यांनी तर आभार प्रकाश खोत यांनी मानले. कार्यक्रमास वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव  समाज परळी च्या समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार