युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

शिव-शक्ती परिक्रमा ; पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र भीमाशंकरचे दर्शन

 शिव-शक्ती परिक्रमा ; पंकजा मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र भीमाशंकरचे दर्शन




पुणे ।दिनांक ०५ ।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकराचे संध्याकाळी दर्शन घेतले.


  शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा कालपासून सुरू झाली आहे. सकाळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात विधिवत पूजा करून दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या