संभाजी ब्रिगेड व मनसेचा संतप्त सवाल

 परळी वैजनाथमधील वाहतूक व्यवस्था भंगारात निघाली का? : संभाजी ब्रिगेड व मनसेचा संतप्त सवाल


सात दिवसांत वाहतूक समस्या न सुटल्यास १२ सप्टेंबर रोजी करणार रास्ता रोको आंदोलन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून "परळी वैजनाथमधील वाहतूक व्यवस्था भंगारात निघाली का?" असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेड व मनसेने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ व जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना उपविभागीय कार्यालयामार्फत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांनी मागे एकदा 'आरटीओ विभागात भंगारमध्ये काढायला हवा' असे प्रतिपादन केले होते. आता त्याचीच प्रचिती परळी वैजनाथ येथे नागरिकांना दररोज पावलोपावली येत आहे.


यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोरे,मनसेचे शहरउपाध्यक्ष ऋषिकेश बारगजे आदी उपस्थित होते.


तसेच सात दिवसांत वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नाही तर १२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे रास्ता रोकोचा इशारा संभाजी ब्रिगेड व मनसेने दिला आहे.


बेफिकिरीने बेशिस्तपणे काही वाहनचालक गाड्या चालवतात त्यामुळे अपघात होतात. दि. ४ सप्टेंबर रोजी डुबे पेट्रोल पंप समोर गंभीर अपघात झाला होता त्यात काहीजण गंभीर जखमी झाले. वारंवार अनियंत्रित वाहतूकीमुळे कोणाचा मृत्यू तर कोणाला अपंगत्व येत आहे त्यामुळे वाहतूक समस्या कायमची सोडवणे हे क्रमप्राप्त आहे.


नागरिकांच्यावतीने संभाजी ब्रिगेड व मनसेने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे;


◆ कोणत्याही रस्त्यांवर बेशिस्तपणे गाड्या पार्क करणाऱ्या गाडी मालकांवरदेखील कारवाई करावी. 


छत्रपती शिवाजी चौकात वळणावर तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर भोवती तसेच इतर चौकाचौकात दुचाकी, चारचाकी वाहने लावतात त्यामुळे रहदारीस अडथळा होतो.


परळी वैजनाथ ते अंबाजोगाई रस्त्यावरील वैद्यनाथ महाविद्यालय जवळील रस्त्यावर दोन्ही बाजू वाहने उभे करण्यासाठी परवानगी कोणाची घेतली? तिथे फूटपाथवर गॅरेज दुकाने कोणत्या विभागाची परवानगी घेऊन थाटली आहेत? हा रस्ता काय वाहने दुरुस्ती करण्यासाठी केला आहे का? असा प्रश्न उपस्थित होते त्यावर कडक कारवाई करावी.


इटके चौक ते थर्मल विश्रामगृह व मौलाना आझाद चौक ते प्रभू वैद्यनाथ मंदिर रस्त्यावर दोन्ही बाजूने जड वाहनांचे पार्किंग स्थळ करण्यात आलेले आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.


◆ उल्लेखनीय विषय म्हणजे बस स्टँडसमोर सकाळी जेव्हा शाळकरी मुले शाळेत जात असतात तेव्हा त्या रस्त्यावर ट्रॅव्हल्स उभ्या असतात. तसेच संध्याकाळी आपापले कामे पूर्ण करून घरी जात असतात तेव्हा मोठी वाहतूक समस्या दररोज निर्माण होते. यावर त्वरित उपाययोजना करावी.


◆ सोबतच इतर ठिकाणी जाणारे एपे ऑटो स्वयंघोषित ऑटो पॉईंट नावाखाली शहरातील मुख्य रस्त्यांवर वाट्टेल तसे ऑटो पार्क केले जातात. त्यातून होणारी अवैध वाहतूक व अपघात हा तर स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.


छत्रपती शिवाजी चौकात वळणावर तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर भोवती तसेच इतर चौकाचौकात दुचाकी, चारचाकी वाहने लावतात त्यामुळे रहदारीस अडथळा होतो. यावर तत्काळ कारवाई करावी.


◆ कित्येक दुचाकी स्वारांच्या वाहनांच्या सायलेंसर व हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक हैराण आहेत अशा बेछूटपणे वागणाऱ्या मोकाट लोकांची शहरात धिंड काढावी जेणेकरून इतरांना कायद्याची जरब बसेल.


◆ तसेच शहरात वाढत्या अपघातास रस्त्यांवर असलेले अतिक्रमण जबाबदार आहे ज्यामुळे जाण्यायेण्यासाठी कमी जागा शिल्लक असते यावरदेखील कारवाई करावी.


◆ सोबतच प्राप्त माहितीनुसार परळी वैजनाथ शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यासाठी जुलै महिन्यांत दहा वाहतूक पोलीस नेमले असल्याची माहिती आहे. ज्यात एक पीएसआय दर्जाचा अधिकरी व ९ कर्मचारी समविष्ट आहेत परंतु प्रत्यक्षात ते कुठल्या अज्ञात स्थळी आहेत हे दुर्बीण घेऊनही कोणी दिसत नाहीत.


◆ वाहतूक पोलिसांना शहरांतील विविध मार्गांवर तैनात करून त्यांच्यामार्फत विना परवाना वाहन चालक, अवैध वाहतूक, बेशिस्त पार्किंग, कर्णकर्कश हॉर्न - सायलेंसर वापरणाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करावी.


◆ तसेच जर वाहतूक विभागाने याबाबत गंभीरपणे काम केले नाहीतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी.


जर १२ सप्टेंबर २०२३ रोजी पर्यंत वरील नमूद सर्व मुद्यांवर / संबंधितांवर कारवाई केली नाही तर संभाजी ब्रिगेड व मनसेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार