डीवायएफआय ची अंतरवली प्रकरणी तीव्र निषेध

 डीवायएफआय ची  अंतरवली प्रकरणी तीव्र निषेध





परळी / प्रतिनिधी


जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे या गावात संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार केला. प्रश्न सोडवून घेण्यासाठी आंदोलने करणे हा लोकशाहीमध्ये अधिकार असतो. या ठिकाणी जे आंदोलन शांततेत चालू असताना कुठलाही कायदा हातात घेतलेला नसताना पोलीस बळाचा वापर करणं हे योग्य नाही. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आपल्या मागण्यांसाठी शेतकरी, विद्यार्थी, युवक,कामगारांचे आंदोलने  देखील मोडून टाकण्याचा डाव ही शासन व्यवस्था करत आहे. या अशा प्रकारच्या घटनाविरोधी कृतीचा डीआयएफआय युवक संघटना परळी तालुका कमिटीच्या वतीने सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दहिफळे  यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यातआला.


यावेळी प्रकाश उजगरे, विजय घुगे, मुंजा नवगरे,सिद्राम सोळंके, बाबा शेरकर,मदन वाघमारे,अशोक जाधव,प्रवीण देशमुख, विष्णुपंत देशमुख, देविदास कांबळे, पंडित शिंदे, राहुल काशीद, मदन राठोड,बिभिषण भिसे, प्रशांत कोकाटे,बबन देशमुख, विशाल देशमुख निवेदन देते वेळी युवक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !