परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

इयत्ता 4थी ते 7वी या वर्गाचा पालक सुसंवाद मेळावा

 ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालय, गणेशपार विभागात पालक संवाद मेळावा उत्साहात 



          परळी ( प्रतिनिधी ) - शहरातील अखिल भारतीय संस्कृत प्रचारिणी संस्था कृष्णानगर ,परळी वै.संचलित, ज्ञानबोधिनी प्राथमिक शाळा,गणेशपार विभागात इयत्ता 4थी ते 7वी या वर्गाचा  पालक सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक सुसंवाद मेळाव्याचे अध्यक्ष ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयाचे सचिव तथा  मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, परळी भूषण मुंडे सर .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशांत मुंडे सर, प्रमुख पाहुणे अश्विन मोगरकर, पालक प्रतिनिधी  श्रीकांत वाघमारे, संतोष बियाणी,  शामराव देशमुख , सरताज रशीद,  प्रकाश चाटुफळे  यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

            यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यानंतर शाळेत राबविले जाणारे  गणित व इंग्रजी या विषयावर आधारीत शैक्षणिक उपक्रम सादर करण्यात आले.

      यावेळी ज्ञानबोधिनी प्राथमिक शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक मुंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की " सध्या इंग्लिश स्कूल चे जाळे सर्वत्र पसरले आहे, अश्या या युगात मराठी शाळा टिकणे गरजेचे आहे. मराठी शाळा ठिकाव्यात यासाठी मराठी शाळांनी आनंददायी शिक्षण पद्धतीचा स्वीकार करून विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास साधता येतो. तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थीनी कु श्रध्दा गायकवाड या मुलींनी देशपातळीवर शाळेचे नाव उंचावले आहे,यावेळी मुलांच्या सर्वागीण विकासावर भर देऊन संस्कार घडवले जातील असे मत त्यांनी  आपल्या भाषणातून व्यक्त केले. 

 अश्विन मोगरकर यांनी पालक सुसंवाद मेळाव्यात शाळेविषयी आपले मत व्यक्त केले. विध्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना नेहमी या शाळेत वाव दिला जातो शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यासाठी या शाळेत होणाऱ्या सांस्कृतिक, समाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास होतो. तसेच शाळेत राबवले जाणारे उपक्रम व अभ्यासक्रम याविषयी शाळेचे कौतुक केले. 

 यावेळी उपस्थित महिला पालकांनीही  शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या पाल्याच्या प्रगती बद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ज्ञानबोधिनी विद्यलयातील शिक्षक घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मुंडे मॅडम यांनी तर प्रास्ताविक केंद्रे सर यांनी तर आभार श्रीमती घोडके मॅडम यांनी मानले शाळेतील क्षीरसागर सर, अलापुरे सर,धुमाळ सर,आंधळे सर सर्व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!