इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातही डंका : 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

 महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातही डंका : 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड



परळी / प्रतिनिधी


शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील व ग्रामीण भागातील नावाजलेली संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 6 विद्यार्थिनींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेले 6 विद्यार्थिनी हे राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.


ग्रामीण भागातील सर्वात जुनी व नावाजलेली शिक्षण संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून एस.एस.सी, एच.एस.सी बोर्ड परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यासह सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा,संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे.


नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शालेय विद्यार्थिनी यांनी नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हा पातळीवर आपली छाप निर्माण केली. संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील किशोरी गटातून प्रियांका शिंदे,ज्ञानेश्वरी गोरे व प्रणाली नावंदे तर कुमारी गटातून किरण कुट्टे, कावेरी गवळी व सुप्रिया सोळंके या सहा विद्यार्थींनीची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.राज्यस्तरीय स्पर्धा ह्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार असून मोहा शाळेच्या विद्यार्थींनी ह्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरावर करणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्याचे व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सुनील तारे,हनुमंत वाघमोडे, सुनील शिंदे यांचे संस्थेचे सचिव, सर्व संचालक मंडळ, शाळेचे प्राचार्य विनायक राजमाने, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, पर्यवेक्षक सुरेंद्र हरदास आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!